Nana Patekar reacts on Allu Arjun Arrest : ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आज तेलुगू सुपरस्टार व चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती. नामपल्ली कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र तेलंगणा हायकोर्टाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आता त्याच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर सिनेविश्वातून प्रतिक्रिया येत आहेत. रश्मिका मंदानाने घडलेल्या प्रकारावर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं आहे. तर वरुण धवन म्हणाला की या घटनेसाठी फक्त एका व्यक्तीला जबाबदार धरणं बरोबर नाही. त्यानंतर नाना पाटेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. त्यांनी अल्लू अर्जुनची अटक योग्य असल्याचं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा – रश्मिका मंदानाची अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “एकाच व्यक्तीवर सर्व दोषारोप…”

आज (१३ डिसेंबर रोजी) नाना पाटेकर त्यांच्या आगामी ‘वनवास’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात गेले होते. तिथे त्यांना अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत विचारण्यात आलं. “जर माझ्यामुळे एखादी घटना घडत असेल आणि कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर मला अटक व्हायला पाहिजे. पण माझी चूक नसेल तर मला अटक होऊ नये,” असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलं.

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया, अभिनेता म्हणाला, “घडलेली घटना दुर्दैवी, पण त्याचा दोष…”

महिलेचं मृत्यू प्रकरण नेमकं काय?

‘पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट ४ डिसेंबरला हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी आज अटक केली होती. मात्र आता तेलंगणा हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar reaction on allu arjun arrest pushpa 2 stampede case hrc