चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी मंगळवारी मुंबईत त्यांच्या आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर लाँच केला. यामध्ये अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नाना सहा वर्षांनंतर हिंदी चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहेत. यावेळी त्यांनी ९ सप्टेंबर रोजी अक्षय कुमारच्या वाढदिवशी जाहीर झालेल्या ‘वेलकम टू द जंगल’ या वेलकम फिल्म फ्रँचायझीच्या पुढील भागाचा ते भाग का नाहीत, याबद्दलही भाष्य केलं.
“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”
ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर इंडियन एक्सप्रेसने नाना पाटेकर यांना चित्रपटांमध्ये परतण्याबद्दल विचारलं. उत्तर देताना पाटेकर म्हणाले, “माझ्यासाठी इंडस्ट्री कधीच बंद झाली नव्हती. तुमच्यासाठी इंडस्ट्रीची दारं कधीही बंद होत नाही. तुम्हाला चांगले काम करायचे असेल तर ते तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला विचारतील. तुम्ही ते करू शकता की नाही, तुम्हाला ते करायचे आहे की नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे. मला वाटतं की ही माझी पहिली आणि शेवटची संधी आहे. इथे प्रत्येकाला काम मिळते, तुम्हाला ते करायचे की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे.”
पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल नाना म्हणाले, “मी त्याचा भाग नाही, कदाचित त्यांना वाटत असेल मी आता खूप म्हातारा झालोय,” ते विवेक अग्निहोत्रींकडे इशारा करून म्हणाले, “त्याला वाटत नाही की मी इतका म्हातारा झालो आहे, म्हणून त्याने मला त्याच्या चित्रपटात कास्ट केले. सगळं असं आहे. ”
२००७ मध्ये ‘वेलकम’ चित्रपट आला होता, तेव्हापासून नाना पाटेकर या कॉमेडी फिल्म फ्रँचायझीचा भाग आहेत. ‘वेलकम’मध्ये ते डॉन उदय शेट्टीच्या भूमिकेत दिसले होते. ते २०१५ मध्ये आलेल्या ‘वेलकम बॅक’चा देखील भाग होते. ‘द व्हॅक्सिन वॉर’बद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये नाना पाटेकर यांनी कोवॅक्सिनचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.