आपल्या दमदार अभिनयाने आणि खास शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे नाना पाटेकर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. आजवर करिअरमध्ये अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले. सिनेसृष्टीत काम करताना त्यांच्यावर आरोपही झाले. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक छळाचे आरोप केले होते, त्या आरोपांबद्दल आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. २००८ मध्ये आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याबरोबर गैरवर्तन केलं होतं, असं तनुश्री म्हणाली होती. आता नाना पाटेकर यांनी या मुद्द्यावर आपली बाजू मांडली आहे. तनुश्रीने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे ते म्हणाले.

अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांच्या मोठ्या लेकाचं झालं निधन, अभिनेते म्हणाले, “मी त्याच्या इतका तिरस्कार…”

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांना तनुश्रीने केलेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्यामुळे आपण या विषयावर कधीही बोललो नाही, असं नाना म्हणाले. या सर्व गोष्टी जुन्या आहेत, त्यात चर्चा करण्यासारखं काहीच नाही. सत्य सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या सर्वांवर आपल्याकडे प्रतिक्रिया देण्यासारखं काही नाही, माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असं नाना पाटेकर यांनी नमूद केलं.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या

तनुश्रीने केलेल्या आरोपांमुळे राग आला होता का? असा प्रश्न नाना पाटेकर यांना मुलाखतीत विचारण्यात आला. “मला या गोष्टीचा राग आला नाही कारण हे सर्व आरोपच खोटे आहेत. मला या आरोपांमुळे काहीच फरक पडला नाही. कारण काही घडलंच नव्हतं. काही झालं असतं तर सांगितलं असतं. अचानक कोणीतरी म्हणतं की तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं. मी तसं काहीच केलेलं नाही याशिवाय मी वेगळं काय बोलू शकतो,” असं नाना पाटेकर यांनी म्हणाले.

अक्षय कुमारच्या सिनेमांवर लावलेले पैसे बुडाले, रकुल प्रीतच्या सासऱ्यांनी २५० कोटींचे कर्ज फेडायला विकलं मुंबईतील ऑफिस

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. मात्र, नानांनी हे सर्व आरोप नाकारले होते. २००८ साली हे घडल्याचं तनुश्रीने म्हटलं होतं. त्या दिवशी सेटवर ५० लोक होते असं नाना पाटेकर म्हणाले होते. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपासंदर्भात कोणतेही पुरावे न मिळाल्याने मुंबई पोलिसांनी नाना पाटेकर यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती.