Nana Patekar is Virat Kohli Fan: विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. आपल्या विलक्षण फलंदाजीने जगाला भुरळ घालणाऱ्या विराटने करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड नावे केले आहेत. विराटचे चाहते फक्त सर्वसामान्यच नाहीत, तर सेलिब्रिटीही आहेत. विराटच्या सेलिब्रिटी चाहत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर होय. नाना पाटेकरांनी स्वतःच याबाबत माहिती दिली आहे.

नाना पाटेकरांना क्रिकेटची खूप आवड आहे. त्यांचा आवडता क्रिकेटपटू कोण, याबाबत त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत उत्तर दिलं. नाना विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांना विराटला मैदानात खेळताना बघायला फार आवडतं, तो बाद झाल्यावर जेवण करायची इच्छा उरत नाही, असंही नाना म्हणाले.

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mamta Kulkarni On Dhirendra Shastri (1)
धीरेंद्र शास्त्रींचं नाव ऐकताच ममता कुलकर्णीचा संताप; म्हणाली, “त्याचं जितकं वय तितकी वर्षे…”, रामदेव बाबांवरही आगपाखड
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
Bride's Father Calls Off Wedding After Groom Dances
Viral News : नवरदेवाचे स्वत:च्याच लग्नात ‘चोली के पिछे क्या है’ गाण्यावर ठुमके; मुलीच्या वडिलांनी मोडलं लग्न
Who Is Himanshu Sangwan He Clean Bowled Virat Kohli on Ranji Trophy Return
Ranji Trophy: विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान आहे तरी कोण? सेहवागचा आहे शेजारी
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Virat Kohli Hugs Childhood Friend Shawez Khan During Ranji Trophy Practice
Virat Kohli: “बाबा…विराट कोहली खरंच तुमचा मित्र आहे?”, विराटने दिल्लीत बालपणीच्या मित्राला पाहताच मारली मिठी; मित्राचा लेक झाला चकित

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

“विराट कोहली मला खूप आवडतो. विराट लवकर बाद झाला की माझी भूक मरते. काहीच खावेसे वाटत नाही,” असं आपल्या आवडत्या क्रिकेटपटबद्दल नाना पाटेकर यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटीत विराट ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आऊट झाला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाना पाटेकरांच्या या वक्तव्याचा उल्लेख करत ते आज जेवणार नाहीत, असे मीम्स बनवले.

हेही वाचा – “तिचा फोन नंबर…”, मनीषा कोईरालाबद्दल विचारल्यावर काय म्हणालेले नाना पाटेकर? एकेकाळी दोघांच्या अफेअरच्या होत्या चर्चा

विराट फक्त सात धावांवर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. अनेकांनी नाना पाटेकरांचं नाव घेत मजेशीर पोस्ट केल्या. त्या पोस्ट चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत.

पाहा पोस्ट –

सोशल मीडियावर ना

दरम्यान, नाना पाटेकर नुकतेच ‘वनवास’ चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांच्याबरोबर उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, खुशबू सुंदर या कलाकारांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. ‘पुष्पा २’ व ‘मुफासा’च्या क्रेझमध्ये ‘वनवास’ प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही, परिणामी चित्रपट बजेटइतकेही पैसे कमवू शकला नाही.

Story img Loader