अभिनेते नाना पाटेकर यांना खूप राग येतो. बऱ्याचदा ते त्यांच्या रागीट स्वभावासाठी इंडस्ट्रीत सर्वश्रूत आहेत. अशातच नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एका चाहत्याला डोक्यावर जोरदार फटका मारताना दिसतात. सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला त्यांनी मारलं. तसेच रागाने त्याच्यावर ओरडले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नाना पाटेकरांनी सांगितलं राग येण्यामागचं कारण; म्हणाले, “तुमची पात्रता…”

नाना ‘गदर २’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘जर्नी’ या चित्रपटात दिसणार आहेत. यात अनिल शर्मांचा मुलगा उत्कर्षदेखील आहे. या चित्रपटाची कथा डिमेन्शियाने ग्रस्त वडील आणि त्यांचा मुलगा यांच्यातील नात्याभोवती फिरते. नाना पाटेकर सध्या वाराणसीमध्ये त्यांच्या या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. यावेळी एक चाहता तिथे सेल्फीसाठी येतो. शूटिंग चालू असताना त्याने सेल्फीसाठी शॉटमध्ये व्यत्यय आणल्याने ते चिडले. त्यांचा राग अनावर झाला व त्यांनी त्याच्या डोक्यावर जोरदार फटका मारला. तसेच त्याला तिथून निघून जायला सांगितलं.

दरम्यान, नाना पाटेकरांचा द व्हॅक्सिन वॉर चित्रपट सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारलं. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट करोना काळात शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या स्वदेशी लस निर्मितीवर आधारित होता.