दिवंगत दिग्गज अभिनेते ओम पुरी यांचे चित्रपट, त्यांचा अभिनय याबाबत खूप चर्चा होते, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार लोकांना माहीत नाही. ओम पुरी यांचं पहिलं लग्न अयशस्वी झालं होतं. त्यांनी अभिनेता अन्नू कपूरची बहीण दिग्दर्शक सीमा कपूरशी १९९१ मध्ये लग्न केलं होतं, पण त्यांचं लग्न वर्षभरही टिकलं नाही. अवघ्या आठ महिन्यात ते दोघे विभक्त झाले होते. लग्न मोडल्यावर त्यांनी जवळ असलेली थोडीफार जमीन होती तीही पहिल्या पत्नीला दिली.

ओम पुरी यांना पुन्हा लग्न करायचं होतं, पण त्यांच्याजवळ पैसे नव्हते. ते कठीण आर्थिक परिस्थितीतून जात होते. त्यांची दुसरी पत्नी लेखिका-पत्रकार नंदिता पुरीने लग्नानंतरचा कठीण काळ सांगितला. या दोघांचे लग्न १९९३ मध्ये झाले होते. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत नंदिता पुरीने ओम पुरींबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. नंदिताने ‘अनलाइकली हीरो: ओम पुरी’ हे पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात नंदिताने ओम यांची पहिली पत्नी सीमाचा उल्लेख करायचा निर्णय घेतल्याने ते रागावले होते, असा खुलासा तिने केला.

ऐश्वर्या रायचा अपघात पाहून अमिताभ बच्चन यांची झालेली ‘अशी’ अवस्था; म्हणालेले, “मी तिच्या आईला…”

नंदिता म्हणाली जेव्हा ओम पुरी यांचे सीमाशी लग्न झाले तेव्हा त्यांच्याकडे फार काही नव्हतं. फक्त एक फ्लॅट होता, जिथे नंदिता अजूनही राहते. तसेच राजस्थानमध्ये थोडीशी जमीन होती, जी त्यांना सीमाला द्यावी लागली होती. पहिल्या लग्नात ओम पुरी यांनी जवळ होतं ते सगळं दिलं, असा उल्लेख नंदिताने पुस्तकात केला होता, जो त्यांना फार आवडला नव्हता.

प्रसिद्ध अभिनेत्री ४३ व्या वर्षी करतेय चौथं लग्न; बॉयफ्रेंडला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, आधीचे तीन पती कोण?

“ओम जी मला म्हणाले, ‘माझ्याकडे तुझ्या मंगळसूत्रासाठीही पैसे नाहीत, माझ्याकडे आता फार काही नाही, पण तुला कोणतीही अडचण येणार नाही, याची खात्री मी करेन. त्या टप्प्यापासून नंतर आयुष्यात आम्ही खूप पुढे गेलो,” असं नंदिता हसत हसत म्हणाली.

रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

ओम पुरी यांना जॅक निकोल्सनच्या ‘वोल्फ’ या हॉलीवूड चित्रपटात काम मिळालं आणि त्यानंतर म्हणजेच लग्नाच्या जवळपास सहा-सात महिन्यांनी त्यांनी नंदिताला मंगळसूत्र घेऊन दिलं. “त्यांना फर्स्ट क्लासचं तिकिट मिळालं आणि ते मला म्हणाले, ‘चल यूएसला जाऊ. मी या तिकिटातून दोन बिझनेस क्लास तिकिटं काढतो. आपलं हनिमून तिकडेच होईल’ त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांनी मला मंगळसूत्र आणि लग्नाची अंगठी दिली,” असं नंदिता म्हणाली.

ओम पुरी आणि नंदिता पुरी २०१३ मध्ये वेगळे झाले. त्यांना एक मुलगा इशान आहे. २०१७ मध्ये ओम पुरी यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले.