रणबीर कपूरच्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी नरगिस फाखरी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नरगिस फाखरीचा बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नाही. त्यामुळे बॉलिवूडमध्ये करिअर करणं नरगिससाठी सोपं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील तिचा आतापर्यंतचा प्रवास आणि इथलं वातावरण यावर भाष्य करत नाराजी व्यक्त केली. चित्रपटसृष्टी पदार्पण केलं तेव्हा ती खूप प्रामाणिक होती त्यामुळे ती समजूतदार नाही असं म्हटलं जायचं. या मुलाखतीत नरगिसने तिच्या आतापर्यंतच्या बॉलिवूड प्रवासावर भाष्य केलं.

नरगिस फाखरीने ‘रॉकस्टार’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मैं तेरा हीरो’, ‘मद्रास कैफे’, ‘हाउसफुल 3’ या चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय तिने ‘स्पाय’ या चित्रपटातून हॉलिवूड पदार्पणही केलं. पण यानंतर ती तिच्या कुटुंबासह अमेरिकेला शिफ्ट झाली. बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर नरगिस पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास तयार आहे. पण तिला काही खास अशी स्क्रिप्ट मिळत नाहीये अशी खंत तिने या मुलाखतीत व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- “माझे ब्रेस्ट मोठे असते तर…”; नरगिस फाखरीने ओठांवरुन ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं

या मुलाखतीत नरगिस म्हणाली, “मला या डावपेचांच्या कल्चरची काहीच माहिती नव्हती. मी माझ्या भावनांबद्दल खूप प्रामाणिक होते. मी खूपच प्रामाणिक आहे असं मला अनेकदा सांगितलं जायचं. जे या क्षेत्रासाठी चांगलं नाही. जरी तू त्या लोकांसह कम्फर्टेबल नसलीस तरीही तू त्यांच्याशी बोल असं सांगितलं जायचं. मला डावपेच खेळण्याची सवय नाही. पण मला तेही करण्यास सांगितलं गेलं होतं. मी समजूतदार नाही असं बोललं गेलं होतं. जेव्हा सलग ८ वर्षे काम करून मला कुटुंबासाठी वेळ उरत नव्हता तेव्हा मी ब्रेक घेतला. तणावामुळे मी आजारी पडू लागले होते.”

आणखी वाचा- दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही इम्रान हाश्मीला किस करत होती अभिनेत्री, शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

नरगिसने सांगितलं की, तिला सातत्याने आरोग्याशी संबंधीत समस्या येत होत्या. ती डिप्रेशनमध्ये होती. ती म्हणाली, “माझ्याबरोबर जे काही घडत होतं त्याने मी खूप दुःखी होते. मी स्वतःलाच प्रश्न करायचे की, जर मला दुःख होतंय तर मी इथे का आहे. मला या डिप्रेशनमधून बाहेर पडायला २ वर्षे लागली. मी अमेरिकेत विपासना मेडिकेशन जॉइन केलं होतं.”

Story img Loader