बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्यांची पत्नी रत्ना पाठक यांच्या धर्माबद्दल भाष्य केलं आहे. लग्नानंतर आपल्यावर लव्ह जिहादचा आरोप कसा झाला याबाबत त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर सध्या देशात धर्म हा राजकीय मुद्दा बनला आहे, असंही ते म्हणाले. तसेच आपल्या आईने रत्नाला धर्म बदलण्यास सांगितलं नव्हतं, असाही खुलासा त्यांनी केला. रत्ना पाठक व नसीरुद्दीन शाहांच्या लग्नाला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पासपोर्टसाठी मुस्लीम नावं दिसली की…”, शरद पोंक्षेंचे वक्तव्य; म्हणाले, “शांततेचा धर्म म्हणून बोंबाबोंब…”

नसीरुद्दीन शाहांनी ‘नॅशनल हेराल्ड’ला एक खुलं पत्र लिहिलं, त्यात त्यांनी त्यांच्या व रत्नाच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत माहिती दिली. “मला हिंदू रत्नाशी लग्न करण्याबद्दल कोणताही संकोच नव्हता, तर रत्नाला मुस्लिमाशी लग्न करण्याबद्दल नव्हता. मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या लग्नाच्या ३८ वर्षांनंतर माजी कॅबिनेट मंत्रीचा पती प्रश्न विचारेल. त्यांनी मला धमकी दिली आणि माझ्यावर लव्ह जिहादचा आरोप केला,” असं शाह म्हणाले.

वडील धर्मेंद्र अन् शबाना आझमींचा किसिंग सीन पाहिल्यावर लेक ईशा देओलने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणाली “ते दोघेही…”

नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले, “जेव्हा मी रत्नाशी लग्न करण्याबद्दल माझ्या घरी सांगितलं तेव्हा माझ्या आईने एकदाच विचारलं की रत्ना इस्लाम स्वीकारणार का? मग मी नाही म्हणालो. आई म्हणाली की बरोबर आहे, तिचा धर्म कसा बदलता येईल. माझ्या आणि रत्नाच्या घरच्यांनीही हे नातं स्वीकारलं. रत्नासोबतचा माझा संसार म्हणजे हिंदू आणि मुस्लीम एकत्र राहू शकतात याचा पुरावा आहे. मग ते कोण आहेत बोलणारे आणि आमच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करणारे. माझा प्रश्न आहे की हे विष आले कुठून? फाळणीच्या काळात पेरलेली ही द्वेषाची बीजे हळूहळू अंकुरत आहेत का?” असं ते म्हणाले.

भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…”

२०२० मध्ये दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांनी नसीरुद्दीन शाहांच्या लग्नावर प्रश्न उपस्थित केला होता. “मिस्टर नसीरुद्दीन शाह, तुम्हाला या देशाने सन्मान, नाव, प्रसिद्धी काहीही सगळं दिलं पण तुम्ही सुखी नाही. तुम्ही तुमच्या धर्माविरुद्ध लग्न केले, पण तुम्हाला कोणी विचारले नाही. तुमचे भाऊ भारतीय सैन्यात लेफ्टनंट जनरल झाले,” असं ते ट्वीटमध्ये म्हणाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naseeruddin shah on interfaith marriage with ratna pathak says its proof hindu muslim can live together hrc