ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारणार आहे. यानिमित्ताने दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी अकबराबद्दल चुकीची माहिती कशी पसरवली जात असल्याचा खुलासा केला. अकबराला नवीन धर्म सुरू करायचा होता, असं म्हटलं जातं त्यावरही त्यांनी भाष्य केलं. तसेच मुघल सम्राटाची भूमिका साकारल्‍याने आपल्याला त्‍याच्‍यातला माणूस शोधण्‍यात मदत झाली, असं शाह यांनी सांगितलं.

“जेव्हा मी त्यांच्यासमोर…” नसीरुद्दीन शाहांबरोबर रोमँटिक सीन करण्याबद्दल संध्या मृदुलचं वक्तव्य

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’मध्ये मुघल सम्राटाबराचे रेखाटलेले चित्र हे नेहमीच एका दयाळू, व्यापक विचारसरणी असलेल्या प्रगतीशील राजाचे होते. अकबर हा केवळ एक चांगल्या हृदयाचा माणूसच नव्हता तर तो खूप रागीट, लैंगिकदृष्ट्या प्रेरित, क्रूर व निर्दयी योद्धा होता. कदाचित तो एक महान प्रेमीही होता. त्याचं कारण म्हणजे त्याच्या शेकडो पत्नी होत्या आणि त्या सर्वांना खूश ठेवण्यासाठी त्याने काहीतरी काम केलं असावं. तरीही त्या सर्व आनंदी होत्या की नाही माहीत नाही. पण या भव्यतेतला माणूस शोधण्यासाठी मी त्याची भूमिका साकारली.”

“…तर ताजमहाल, लाल किल्ला पाडा” मुघलांचा उल्लेख करत नसीरुद्दीन शाहांचं वक्तव्य; म्हणाले “माझ्या विचारांना विरोध…”

अकबराबद्दल कशी चुकीची माहिती पसरली आहे, याबद्दलही शाह यांनी सांगितलं. “मलममध्ये एक नवीन धर्म सुरू करण्याची त्यांची इच्छा होती, असं म्हटलं जातं. आपण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये याबद्दल वाचतो, तो पूर्णपणे मूर्खपणा आहे. हे मी इतिहासकारांकडून तपासलं आहे आणि अकबराने कधीही नवीन धर्म सुरू करण्याचा प्रयत्न केला नाही. ही एक वस्तुस्थिती आहे, जी आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे ज्याला दिन-ए-इलाही म्हणतात. पण अकबरने कधीही दिन-ए इलाही हा शब्द वापरला नाही. त्याने त्याला वाहदत-ए इलाही म्हटलं, ज्याचा अर्थ सर्वांची निर्मिती करणारा एकच होता, असा होतो. तुम्ही कोणाची उपासना करता, तुम्ही त्याची कोणत्या रूपात पूजा करता, याने फरक पडत नाही, कारण तुम्ही निर्मात्याची उपासना करता. तुम्ही दगडाची पूजा करू शकता, तुम्ही क्रूसीफिक्सची पूजा करू शकता, तुम्ही काबाला डोकं टेकवू शकता, तुम्ही उगवत्या सूर्याची पूजा करू शकता आणि तुम्हाला जे आवडतं ते करत असलात तरी तुम्ही एकाच गोष्टीची पूजा करत आहात, असा त्यांचा विश्वास होता, हेच मला कळलं,” असं यावेळी बोलताना नसीरुद्दीन शाहांनी स्पष्ट केलं.

‘बेशरम रंग’ गाण्यावरील वादावर पहिल्यांदाच बोलली दीपिका पदुकोण; म्हणाली, “मी व शाहरुख खान…”

यापूर्वी नसीरुद्दीन शाह अकबर व मुघल साम्राज्याबद्दल बोलले होते. मुघल इतकेच वाइट होते, तर त्यांनी निर्माण केलेला लाल किल्ला व ताज महाल पाडा, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, त्यांची ‘ताज- डिवाइडेड बाय ब्लड’ ही वेब सीरिज ५ मार्च रोजी झी 5 वर प्रदर्शित केली जाणार आहे.