सातत्याने वादग्रस्त वक्तव्य दिल्याने अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर बरीच टीकाही झाली, तर काहींनी त्यांचं कौतुकही केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. पत्नी रत्ना पाठक शाह यांच्या प्रेमात ते कसे पडले याबद्दल त्यांनी सांगितलं आहे शिवाय अभिनेत्रीचे कुटुंबीय त्यांच्या लग्नासाठी तयार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नसीरुद्दीन शाह ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधतांना म्हणाले, “आम्ही एकत्र राहत नव्हतो, आमचे अफेअर होते. लग्नाआधी आम्ही तब्बल सात वर्षे एकमेकांना डेट केले होते. तिचे आई-वडील आमच्या लग्नाच्या विरोधात होते, कारण मी एक ड्रग अ‍ॅडिक्ट होतो, शिवाय माझे आधी लग्न झाले होते आणि माझा स्वभावही फार चांगला नव्हता, पण रत्नाने या सगळ्याकडे दुर्लक्ष केले.”

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या शोदरम्यान लोकांनी चित्रपटगृहात केली तोडफोड; नेमकं कारण आलं समोर

पुढे नसीरुद्दीन म्हणाले, “रत्नाला पाहताक्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो. मी नुकताच माझा पहिला चित्रपट केला होता जेव्हा आमची ओळख झाली. ती तेव्हा सत्यदेव दुबे यांच्या नाटकात काम करायची. आम्ही सुख-दुःखात एकमेकांबरोबर खंबीरपणे उभे राहिलो. आमचं नातं आणखी भक्कम होण्यामागील एकमेव कारण म्हणजे रत्ना आहे. आमच्यातील मैत्री कायम होती.”

जवळपास सात वर्षे डेट केल्यानंतर रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांनी २ एप्रिल १९८२ रोजी लग्न केले. त्यांना पहिल्या लग्नापासून हिबा शाह ही मुलगी आहे. रत्ना आणि नसीरुद्दीन यांना इमाद शाह आणि विवान शाह ही दोन मुले आहेत. इमाद आणि विवान दोघेही अभिनेते आहेत. नसीरुद्दीन अलीकडेच ‘झी ५’च्या ‘ताज’ या सीरिजमध्ये दिसले, यात त्यांनी सम्राट अकबराची भूमिका केली होती. तसेच रत्ना पाठक शाह यांनी ‘कच्छ एक्सप्रेस’मधून गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naseeruddin shah says family of ratna pathak shah was against their marriage because he was drug addict avn