ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडतात. अशातच सध्या त्यांचा दिल्ली विमानतळावरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह सेल्फीवरून चाहत्यांवर भडकलेले पाहायला मिळत आहेत.
नसीरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ ‘इस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत चाहत्यांवर भडकून अभिनेते त्यांना ओरडताना दिसत आहेत. नसीरुद्दीन शाह चाहत्यांना म्हणाले, “तुम्ही लोकांनी खूप चुकीचं काम केलं आहे. तुम्ही माझं डोकं फिरवलं आहे. माणूस कुठेतरी जात आहे तरीही त्याला तुम्ही सोडत नाहीत. तुम्ही समजून का घेत नाहीत?”
हेही वाचा – Pooja Bhatt: वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट
नसीरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी त्यांना या व्हिडीओवरून ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आपण खरंच यांना महत्त्व देणं बंद केलं पाहिजे.” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अतिशय उद्धट वागणूक आहे. प्रेक्षकांमुळे ते स्टार झाले आहेत, हे त्यांनी विसरू नये.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “कॅमेरा पाहात लगेच हे भूमिकेत येतात. व्वा काय परफॉर्मेन्स आहे.”
हेही वाचा – ’12th Fail’ फेम विक्रांत मेस्सीने दाखवली लेकाची पहिली झलक, जाहीर केलं नाव
दरम्यान, जरी अनेकांनी नसीरुद्दीन शाह यांना ट्रोल केलं असलं तरी बऱ्याच जणांनी त्यांचं समर्थन देखील केलं आहे. “हे त्यांचं वय आहे. बाकी काही नाही. त्यांना एकट सोडा”, “नसीरुद्दीन शाह भडकलेत याचा अर्थ ते बरोबर करत आहेत”, अशा अनेक प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी त्यांच्या समर्थनार्थ दिल्या आहेत.