नसीरुद्दीन शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. गेली अनेक दशकं बॉलीवूडमध्ये सक्रिय असलेल्या शाह यांनी आतापर्यंत खूप सिनेमांमध्ये काम केलं आहे. दरम्यान सिनेमात काम करत असताना त्यांच्या मित्रानेच त्यांच्यावर चाकूने वार केला होता आणि एका अभिनेत्याने त्यांना वाचवलं होतं. ‘अँड देन वन डे’ या पुस्तकात त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.
“माझे जन्मगाव…”, ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ बनल्यावर कोल्हापूरच्या विशाल पिंजानीची पोस्ट
१९७७ मध्ये आलेल्या ‘भूमिका’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकेदिवशी नसीरुद्दीन ओम पुरीबरोबर जेवायला गेले होते. तेवढ्यात त्यांचा मित्र जसपाल तिथे आला. नसीर व जसपाल यांचं नातं तणावपूर्ण होतं. “आम्ही एकमेकांकडे दुर्लक्ष केले पण, पण त्याची नजर माझ्यावर खिळली, तो माझ्या मागे दुसर्या टेबलावर बसायला गेला, असं मला वाटलं. पण थोड्या वेळाने माझ्या पाठीवर एक लहान तीक्ष्ण वस्तूने वार केल्याचं मला जाणवलं. मी तिथून उठण्याचा प्रयत्न करू लागलो. पण मी हालचाल करण्याआधीच ओम ओरडला आणि त्याला पकडलं. ज्याच्याजवळ असलेल्या चाकूवरून रक्ताचे थेंब खाली पडत होते. त्याने पुन्हा एकदा वार करण्याचा प्रयत्न केला, पण ओम आणि इतर दोघांनी त्याला नियंत्रित केलं,” असं त्यांनी सांगितलं.
नसीरुद्दीन यांनी पुढे लिहिलं, “जसपालला किचनमध्ये नेण्यात आलं आहे, असं ओमने मला सांगितलं. तो मला डॉक्टरांकडे घेऊन जात होता पण रेस्टॉरंटच्या कर्मचार्यांनी पोलीस येईपर्यंत आम्हाला जाऊ देणार नसल्याचं म्हटलं. जेव्हा रुग्णवाहिका आली, तेव्हा ओमने परवानगीशिवाय आत चढण्याची चूक केली. त्याने बॉस-मॅनला चिडवले आणि पोलिसांना माझ्याशी नीट वागण्यास सांगितले. त्याला उतरण्यास सांगण्यात आलं पण तो उतरला नाही. आम्ही रुग्णवाहिकेत होतो आणि आम्ही कुठे जातोय याबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे ते आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ नयेत, यासाठी मी प्रार्थना करत होतो.”
जसपालने वार केल्याने नसीरुद्दीन यांना जखम झाली होती. “रक्तस्त्राव थांबत नव्हता, तीव्र वेदना होत होत्या आणि पोलिसांना नेमकं काय घडलंय ते कळत नव्हतं. आम्हांला काही प्रश्न विचारले आणि नंतर आम्ही जुहू येथील कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हे सगळं झाल्यानंतर मी घरी एकटा असताना जसपाल भेटायला आला होता. पण माफी मागण्याऐवजी त्याने जे काही घडले त्यात पर्सनल काहीच नव्हतं, असं म्हटलं होतं,” असं नसीरुद्दीन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.