सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक पती हार्दिक पंड्यापासून विभक्त झाल्यानंतर आता आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. विभक्त झाल्यानंतर ती आपल्या मायदेशी सर्बियाला परतली होती, पण आता ती पुन्हा भारतात परतली असून नव्या सुरुवातीसाठी सज्ज आहे.
शनिवारी नताशाने तिचा आगामी म्युझिक व्हिडीओ ‘तेरे करके’चा पहिला लूक शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या गाण्यात ती प्रसिद्ध गायक प्रीत इंदरबरोबर दिसणार आहे.
या पोस्टरमध्ये नताशा अगदी ग्लॅमरस दिसत आहे, तर गाण्याच टीझर ६ ऑक्टोबर २०२४ रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाल आहे. हे पोस्टर नताशाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. तिने तिच्या पोस्टला कॅप्शन दिलं, “Get ready to groove to the beat of #TereKrke,” म्हणजेच ‘तेरे करके’ च्या तालावर थिरकण्यासाठी सज्ज व्हा. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
हार्दिक पंड्याच्या भावाने केली नताशाच्या पोस्टवर कमेंट
नताशाच्या या पोस्टवर हार्दिक पंड्याचा भाऊ कुणाल पंड्याने हार्ट इमोजीने प्रतिक्रिया दिली, तर चाहत्यांनीही नताशाच्या समर्पणाचं कौतुक केलं. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, “ती आता आपल्या मुलासाठी मेहनत करत आहे!! स्ट्राँग लेडी,” तर दुसऱ्याने तिच्या लूकचं कौतुक करताना म्हटलं, “मदर इज मदरिंग!” आणखी एका चाहत्याने तिला प्रोत्साहन देत म्हटलं, “बेस्ट ऑफ लक, नताशा; तुला इंडस्ट्रीत परतताना पाहून खूप आनंद झाला.”

नताशाने आपल्या करिअरची सुरुवात विविध जाहिरातींमधून केली होती आणि २०१३ मध्ये ‘सत्याग्रह’ या चित्रपटात एका डान्स नंबर ‘अइयो जी’मध्ये ती झळकली होती. त्यानंतर तिने विविध विशेष आणि कॅमिओ भूमिका केल्या. २०२० मध्ये आलेल्या ‘फ्लेश’ या वेब सीरिजनंतर नताशा कुठल्याही कलाकृतीत झळकली नव्हती. आता ‘तेरे करके’च्या माध्यमातून ती पुनरागमन करत आहे.

हार्दिक आणि नताशाने त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे केली होती. अनेक महिने माध्यमांत आणि सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटावर चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. १८ जुलै रोजी त्यांनी आपला घटस्फोट जाहीर केला. त्यांनी परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला आणि आपला मुलगा अगस्त्यासाठी सह-पालकत्वाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला.