रणवीर सिंह म्हटलं की जबरदस्त एनर्जी, धमाकेदार डान्स हे समीकरण ठरलेलं आहे. बॉलिवूडच्या या टॉपच्या अभिनेत्याचे लाखोंच्या घरात चाहते आहेत. रणवीरची एक झलक पाहण्यासाठी चाहते मंडळी बरीच धडपड करतात. एखाद्या कार्यक्रमामध्ये त्याने हजेरी लावली की प्रत्येकजण रणवीरला पाहण्यासाठी उत्सुक असतो. असंच काहीसं काळाचौकी-लालबाग परिसरामध्ये घडलं. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – ट्रोलिंग, नकारात्मक चर्चा अन्…; प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच बॉयकॉट करण्याची मागणी

काळाचौकी-लालबागमध्ये पोहोचला रणवीर सिंग

देशभरात नवरात्रोत्सव सध्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे. मुंबईमध्येही ठिकठिकाणी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांना सेलिब्रिटी मंडळीही हजेरी लावत आहेत. काळाचौकी-लालबागच्या भगतसिंग मैदानामध्येही मराठी दांडिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला रणवीरने आवर्जून हजेरी लावली होती.

पाहा व्हिडीओ

रणवीर आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी तसेच कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी इथवर पोहोचला. यादरम्यानचा व्हिडीओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यावेळी त्याने ‘गली बॉय’ चित्रपटामधील ‘अपना टाइम आएगा’ हे गाणंही गायलं. रणवीरचा उत्साह पाहून तरुणाई तर भारावून गेली.

आणखी वाचा – Video : प्राजक्ता माळीच्या घराची सफर, अभिनेत्रीने आपल्या हक्काच्या घराची केली सुंदर सजावट

इतकंच नव्हे तर त्याची एक झलक पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली होती. यावेळी त्याने ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटामधील ‘मल्हारी’ गाण्यावर जबरदस्त डान्स परफॉर्मन्सही केला. मंचावरुन खाली उतरत तो चाहत्यांच्या गर्दीमध्ये उभा राहिला. तसेच त्यांना भेटला. रणवीरची लोकप्रियता तसेच प्रेक्षकांचं त्यावर असणारं प्रेम या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.