महानायक अमिताभ बच्चन व दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिचा ५० वा वाढदिवस रविवारी (१७ मार्च रोजी) मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. श्वेताच्या वाढदिवसाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला तिची लेक नव्याचा कथित बॉयफ्रेंड ‘गली बॉय’ फेम सिद्धांत चतुर्वेदीही पोहोचला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वेताच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ग्रॅण्ड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. तसेच श्वेताचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनीही तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत नव्या नंदाचा कथित बॉयफ्रेंड सिद्धांत चतुर्वेदीही दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धांत चतुर्वेदी कारमध्ये बसलेले दिसत आहेत. सिद्धांतने पांढरा शर्ट आणि मॅचिंग पांढरी टोपी घातली होती. सिद्धांत या लूकमध्ये खूप कूल दिसत होता.

सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नंदा यांच्या डेटिंगबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. अनेकदा नव्या व सिद्धांत एकत्र दिसतात, ते गोव्याला फिरायला एकत्र गेले होते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता नव्याच्या आईच्या वाढदिवसाला सिद्धांत आल्याने पुन्हा एकदा त्याच्या व नव्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

एकेकाळी ८० रुपये रोजंदारीवर केलं काम, बीडच्या तरुणाने उभारली १० कोटींची कंपनी, ‘शार्क टँक इंडिया’मध्ये झळकला

श्वेता बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीत सिद्धांत व्यतिरिक्त करण जोहर, अमिताभ बच्चन, जया बच्चन, गौरी खान आणि सुहाना खानसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पण तिचा भाऊ अभिषेक बच्चन आणि वहिनी ऐश्वर्या राय बच्चन श्वेताच्या पार्टीत गैरहजर होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navya nanda rumoured boyfriend siddhant chaturvedi at shweta bachchan birthday party video viral hrc