महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशातच या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात दोघेही विमानतळावर एकत्र दिसत आहेत. रविवारी नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी व्हेकेशनवरून परतले. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत ट्विनिंग केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये नव्या पांढरा टॉप आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे तर सिद्धांत पांढऱ्या टी-शर्टमध्ये मॅचिंग पँट आणि कॅपमध्ये दिसत आहे. त्याने मास्कही लावला होता. मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दोघे एकमेकांशी गप्पा मारत होते.

सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली नंदा यांच्या डेटिंगच्या अफवा एकमेकांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर केलेल्या कमेंट्सनंतर सुरू झाल्या. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीतही ते एकत्र नाचताना दिसले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चित्रपट निर्माते अमृतपाल सिंग बिंद्रा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतून हे दोघेही एकत्र बाहेर पडताना दिसले होते. यावेळी ते सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच एकत्र दिसले होते.

“म्हातारा ही कमेंट…”, ५७ व्या वर्षी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना आशिष विद्यार्थींनी सुनावलं

अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या ही एक उद्योजिका आहे. तर, सिद्धांतने ‘गली बॉय’, ‘गेहराईयां’, ‘बंटी और बबली २’ आणि ‘फोन भूत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. दरम्यान, फोन भूतच्या प्रमोशनदरम्यान सिद्धांतला नव्याला डेट करत असल्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा ‘मी कुणाला तरी डेट करतोय या चर्चा खऱ्या आहेत, असं मी म्हणू शकतो असतो तर बरं झालं असतं,’ असं तो म्हणाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navya naveli nanda and siddhant chaturvedi dating rumours after they spotted at mumbai airport video viral hrc