नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टचा दुसरा सीझन फेब्रुवारीमध्ये आला तेव्हा नव्याची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांनी तिच्या शोमध्ये हजेरी लावली होती. नुकत्याच ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा तिला विचारण्यात आलं की, आजोबा अमिताभ बच्चन, मामा अभिषेक बच्चन आणि मामी ऐश्वर्या राय तिच्या शोमध्ये कधी हजेरी लावणार. यावर ती म्हणाली, “जेव्हा या पॉडकास्टचा तिसरा सीझन येईल तेव्हा मला कुटुंबाबाहेरील पाहुण्यांना बोलवायला आवडेल.”
याआधीच्या एका एपिसोडमध्ये, नव्याचा भाऊ अभिनेता अगस्त्य नंदा उपस्थित होता आणि तेव्हा त्याने पुरुषत्व आणि मानसिक आरोग्याबद्दल गप्पा मारल्या होत्या. जेव्हा नव्या एपिसोडचा प्रोमो जाहीर झाला होता तेव्हा चाहत्यांना वाटलं ऐश्वर्या राय बच्चनसुद्धा या पॉडकास्टला हजेरी लावेल. नव्याच्या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, मला या पॉडकास्टमध्ये ऐश्वर्या रायला पाहायचे आहे. तर दुसऱ्याने विनंती करत लिहिले, “कृपया शोमध्ये ऐश्वर्याला दाखवा.”
ती पुढे म्हणाली, “वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं या शोमध्ये आली तर खूप चांगलं होईल. कदाचित शास्त्रज्ञ आले. तर त्यांच्यासाठी विज्ञानाचा अर्थ काय आहे, त्यांनी कोणते शोध लावले इत्यादींबद्दल ते सांगतील. पॉडकास्ट दरम्यान चर्चिल्या गेलेल्या विविध गोष्टींबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन आमच्या ज्ञानात भर घालेल.
तिने असंही सांगितलं की, ती क्रिकेटपटू दीप्ती शर्माची खूप मोठी चाहती आहे आणि तिला ‘व्हॉट द हेल नव्या’मध्ये आमंत्रित करू इच्छिते. “ती अविश्वसनीय आहे आणि मला तिला शोमध्ये आमंत्रित करायला आवडेल!”
गेल्या महिन्यात, न्यूज १८ शोशाबरोबर बोलताना तिचे आजोबा, अमिताभ किंवा मामू, अभिषेक कधीतरी या शोमध्ये स्पेशल हजेरी लावतील का असे विचारले असता, नव्याने उत्तर दिले, “मग तो संपूर्ण वेगळा पॉडकास्ट असेल. आमच्या शोमध्ये त्यांच्या उपस्थितीसाठी आम्ही पात्र आहोत की नाही हे मला माहित नाही. पण हो, कदाचित एक दिवस स्पेशल अपिअरन्स म्हणून आम्ही त्यांना नक्की आमंत्रित करू.”
हेही वाचा… “आज काय बनवू?”, अक्षराने पती अधिपतीला प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला…
दरम्यान, नव्या नवेली नंदा होळीदिवशी बच्चन कुटूंबाबरोबर रंगपंचमी साजरी करताना दिसली. याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. होळीच्या दिवशी मात्र ऐश्वर्या आणि आराध्या दिसल्या नाहीत. नव्याच्या पोस्टमध्ये अनेक चाहत्यांनी याबद्दल विचारणा केली.