सध्या पॅरिस फॅशन विक सुरू आहे. यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पॅरिसला पोहोचली आहे. या फॅशन विकमधून काही व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्याचा रॅम्प वॉक पाहायला मिळत आहे. यंदाचा पॅरिस फॅशन विक बच्चन कुटुंबासाठी खास आहे. कारण ऐश्वर्याबरोबरच तिची भाची नव्या नवेली नंदाने पॅरिस फॅशन विकमध्ये पदार्पण केलं आहे. श्वेता बच्चनने लेकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”

श्वेताने तिची आई जया बच्चन यांच्याबरोबरचे स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात त्या दोघी प्रेक्षकांमध्ये बसून नव्याचा रॅम्पवॉक पाहत आहेत. तर नव्या आत्मविश्वासाने रॅम्पवर आणि तिचा वॉक पूर्ण केला. यावेळी तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तिने कॉस्मेटिक ब्रँड L’Oréal Paris साठी रॅम्पवॉक केला. श्वेताने आपल्या मुलीच्या व्हिडीओ शेअर करत “लिटल मिस लॉरियल” असं कॅप्शन दिलं आहे.

पॅरिस फॅशन वीकमध्ये नव्याची मामी ऐश्वर्या राय बच्चनही उपस्थित होती. ऐश्वर्याने L’Oréal Paris ची भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून वॉक केला. यावेळी तिने गोल्डन रंगाचा गाऊन परिधान केला होता. मामी व भाची दोघींनी पॅरिस फॅशन विकमध्ये एकाच दिवशी रॅम्पवॉक केला पण एकत्र नाही.

एकूणच फॅशन विश्वात पॅरिस फॅशन विकची जोरदार चर्चा आहे. ऐश्वर्या राय बच्चन, नव्या नवेली नंदा यांच्याशिवाय फॅशन शोमध्ये केंडल जेनर, इवा लॉन्गोरिया, अँडी मॅकडोवेल, हेलन मिरेन, अजा नाओमी किंग, व्हायोला डेव्हिस आणि इतर सेलिब्रिटींनी वॉक केला. या फॅशन शोमधील व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navya naveli nanda debut at paris fashion week aunty aishwarya rai bachchan walks on same ramp hrc