अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या फार चर्चत आहेत. जया यांनी त्यांच्या मुलीसह, श्वेता बच्चन नंदासह ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलला भेट दिली होती. विशेष म्हणजे हे चॅनल त्यांची नात नव्या नवेली नंदाने सुरु केले आहे. या पॉडकास्टच्या निमित्ताने बच्चन कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसल्या. पण यावेळी जया बच्चन यांनी केलेल्या एका विधानामुळे त्या फार चर्चेत आल्या. आता आजीच्या त्या विधानावर त्यांच्या नातीने उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : Bigg Boss 16: ” तू ढोंगी…”, अखेर सलमान खानने साजिद खानबाबत व्यक्त केली नाराजी
‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलच्या जया बच्चन आणि श्वेता नंदा काही दिवसांपूर्वी सहभागी झाल्या होत्या. या भागामध्ये जयाजींनी वेगवेगळ्या विषयांवर मत मांडत त्यामागील स्पष्टीकरण सुद्धा दिले. यावेळी जया बच्चन यांनी नातेसंबंधनावर मोकळेपणाने भाष्य केलं. तसेच प्रत्येक नात्यात आवश्यक असणाऱ्या भावभावना यांबद्दलही त्या बोलल्या. हे सगळं बोलत असताना त्यांनी नव्याला “लग्न न करता तुला बाळ झालं, तरी मला चालणार आहे,” असं म्हटलं. त्यांच्या या बोलण्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
जया बच्चन यांच्या या विधानावर आता नव्या नवेली हिने प्रतिक्रिया दिली आहे. नव्याने नुकतीच ‘एनडीटीव्ही’ला मुलाखत दिली. यावेळी आजीजे हे बोलणे ती कधीही विसरणार नसल्याचं तिने सांगितलं. नव्या म्हणाली, “आमचं संभाषण हे खूप सोपं होतं. आजी आणि आईशी बोलताना मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्यासारखं अजिबात वाटलं नाही. मुळात हा कार्यक्रम महिलांसाठी बनवलेला आहे. या पॉडकास्टमागील संपूर्ण कल्पना महिलांसाठी एक सुरक्षित जागा निर्माण करण्याची आहे आणि जे आम्ही त्या भागात केलं असं मला वाटतं. त्यांच्याशी नातेसंबंध आणि मैत्री या विषयांवर चर्चा करताना मला खूप कम्फर्टेबल वाटलं आणि त्यांच्याशी बोलताना मला माझ्यातला आत्मविश्वास जाणवत होता. आई आणि आजीशी केलेलं हे बोलणं मी कधीही विसरणार नाही.”
हेही वाचा : काजोलच्या वागण्यामुळे नेटकऱ्यांनी तिची केली जया बच्चन यांच्याशी तुलना; म्हणाले…
पुढे ती म्हणाली, “आज प्रत्येकजण आपल्याला बघत असतो. काहीजण आपल्या मतांशी सहमत असतात तर काही त्यांना विरोध करतात. या सगळ्याची मला पूर्ण माहिती आहे आणि माझ्या पॉडकास्टमधून मी हसत-खेळत काही महत्वाच्या विषयांबद्दल चर्चा करणार आहे. तुम्ही त्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे.”