अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही मनोरंजनसृष्टीतील पदार्पणाच्या आधीपासूनच खूप चर्चेत असते. अजून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण जरी केलं नसलं तरीही तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. नव्यादेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करू पाहणाऱ्या एका नेटकऱ्याला नव्याने उत्तर देत गप्प केलं आहे.

नव्या सध्या गुजरातमध्ये आहे. शहरातील धावपळीच्या जगातून थोडं लांब जात गुजरातमध्ये ती गावाकडील शांत आणि निवांत जीवनशैलीचा आनंद घेत आहे. या ट्रिपदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. यातील एका व्हिडीओमध्ये ती चक्क ट्रॅक्टर चालवतानाही दिसली. परंतु त्यावर कमेंट करत एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
raha Kapoor cutest christmas wish to paparazzi and also gives flying kiss to all video viral
आधी ख्रिसमसच्या शुभेच्छा, मग फ्लाइंग किस…; चिमुकली राहा…
Nana Patekar and Aamir Khan News
Aamir Khan : आमिर खानचं नाना पाटेकरांच्या प्रश्नाला उत्तर, “मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, कारण दोन भिन्न भूमिकांची तुलना…”
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
vivek oberoi
“माझा प्रेमभंग झाल्यानंतर मी…”, विवेक ओबेरॉय म्हणाला, “मी प्रेमात स्वत:ला इतके समर्पित…”
Gaurav More Hindi Film movie poster
फिल्टरपाड्याचा बच्चन हिंदी सिनेमात झळकणार! गौरव मोरेने शेअर केलं पहिलं पोस्टर; म्हणाला, “आशीर्वाद…”
Sunny Leone reacts on her name in Chhattisgarh scheme
पतीचे नाव जॉनी सीन्स अन् खात्यात सरकारी योजनेचे पैसे; लाभार्थ्यांच्या यादीत नाव आल्यावर सनी लिओनी म्हणाली…

आणखी वाचा : लग्न न करताच बाळ होण्याबद्दल जया बच्चन यांनी केलेल्या विधानावर नात नव्याची प्रतिक्रिया; म्हणाली…

या व्हिडीओमध्ये ट्रॅक्टर चालवत असताना नव्याने साधा कॉटनचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तिचा हा लूक पाहून एका नेटकऱ्याने लिहिलं, “सॉरी, पण एकच ड्रेस तू पुन्हा पुन्हा घालतेस का? याच ड्रेसमध्ये तू आधी मध्य प्रदेशची टूर केली होतीस.” नेटकऱ्याच्या या कमेंटवर नव्यानेदेखील शांतपणे उत्तर देत रिसायकलिंगचा हॅशटॅग वापरला.

हेही वाचा : बिग बींच्या नातीची खवय्येगिरी; रस्त्याच्या कडेला चाट-पापडीचा आस्वाद घेताना दिसली नव्या, फोटो चर्चेत

आता नव्याच्या या कमेंटने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या कमेंटवर प्रतिक्रिया देत नेटकरी तिच्या साधेपणाचं खूप कौतुक करत आहेत. नव्याची ही कमेंट आता चांगली चर्चेत आली आहे.

Story img Loader