‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. काही दिवसांपूर्वीच हे दोघे एअरपोर्टवर एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते मूव्ही डेटवर जाताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – तमन्ना भाटियाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर विजय वर्मा म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या पापाराझी अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये नव्या व सिद्धांतला एका मल्टिप्लेक्सबाहेर कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. तसेच दोघेही मूव्ही डेटवर गेल्याचं कॅप्शनही व्हिडीओला देण्यात आलंय. नव्याने व्हाइट टॉप आणि ब्लॅक पँट घातली होती व ग्रीन जॅकेट घातलं होतं. तर, सिद्धांत ने कॅजुअल व्हाइट शर्ट आणि काळी पँट घातली होती.

दरम्यान, १० दिवसांपूर्वी नव्या नवेली नंदा व सिद्धांत चतुर्वेदी मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले होते. दोघेही गोवा व्हेकेशनवरून परतल्याचं म्हटलं जात होतं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

‘फोन भूत’च्या प्रमोशनदरम्यान सिद्धांतला नव्याला डेट करत असल्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा ‘मी कुणाला तरी डेट करतोय या चर्चा खऱ्या आहेत, असं मी म्हणू शकतो असतो तर बरं झालं असतं,’ असं तो म्हणाला होता.