बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून नव्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी व नव्या एकमेकांना गुपचूप डेट करत असल्याची जोरदार चर्चा अजूनही रंगली आहे. अशातच सिद्धांतच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या नवेलीच्या कथित बॉयफ्रेंड म्हणजेच सिद्धांतचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील सिद्धांतच्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत, अभिनेता धकधक गर्ल माधुरी दीक्षितला स्टेजवर जाण्यासाठी मदत करतो. यासाठी तो माधुरीचा ड्रेस पकडतो आणि तिला स्टेजपर्यंत सोडताना दिसत आहे. सिद्धार्थची हिच कृती अनेकांना आवडली आहे. तर अनेक जण त्याला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा – “…तर मला अटक करा”, तीन दिवसांपूर्वी पुन्हा बाबा झालेले सिद्धू मुसेवालाचे वडील असं का म्हणाले? जाणून घ्या…

या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, माधुरी नेहमीच खूप सुंदर दिसते. पण यावेळी या व्यक्तीने सगळ्यांची मनं जिंकली. त्याने जास्त लक्ष वेधून घेतलं. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “प्रत्येक तरुण अभिनेता हा माधुरी दीक्षितचा चाहता असतो.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हा खूपच जंटलमन आहे. पण शाहरुख खान काही औरच आहे.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “या सगळ्यांना शाहरुख खानसारखे व्हायचे आहे.”

हेही वाचा – ‘हा’ दिग्गज मराठी अभिनेता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात साकारणार सुभाषचंद्र बोस यांची भूमिका, ओळखलंत का?

दरम्यान, सिद्धांतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो रणवीर सिंहबरोबर ‘गली बॉय’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटातील सिद्धांतने साकारलेल्या भूमिकेला प्रक्षेकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या भूमिकेमुळे सिद्धांतला इंडस्ट्रीत एक नवी ओळख मिळाली. ‘गली बॉय’नंतर सिद्धांत ‘गहराइयां’ चित्रपटात दीपिका पदुकोणसह रोमान्स करताना दिसला होता. तसेच अलीकडे अभिनेता ‘खो गए हम कहां’ मध्ये झळकला होता. या चित्रपटात सिद्धांत अनन्या पांडेबरोबर झळकला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navya naveli rumoured boyfriend siddhant chaturvedi helps madhuri dixit video viral pps