गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीची पूर्वाश्रमीची पत्नी आलिया सिद्दीकी त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे. या दोघांमधील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. नवाजुद्दीनच्या कुटुंबियांवरही आलियाने आरोप केले होते. मात्र या सगळ्या प्रकरणावर नवाजुद्दीने मौन पाळलं होतं. आता त्याचा राग अनावर झाला आहे. नवाजुद्दीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आलियावर आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – पत्नी आलियाच्या गंभीर आरोपांवर नवाजुद्दीन सिद्धीकीने पहिल्यांदाच सोडलं मौन, राग व्यक्त करत म्हणाला, “हा तमाशा…”

नवाजुद्दीने त्याचा घटस्फोटा झाला असल्याचं सांगितलं आहे. पण त्याचबरोबरीने आलिया त्याच्यावर खोटे आरोप करत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. नवाजुद्दीन म्हणाला, “मुलांना भारतात बोलावण्यापूर्वी ४ महिने ती दुबईमध्येच त्यांना सोडून आली होती. गेल्या दोन वर्षांपासून महिन्याला मी तिला १० लाख रुपये देतो. ती मुलांबरोबर दुबईला स्थायिक होण्यापूर्वी मी तिला ५ ते ७ लाख रुपये देत होतो. शिवाय शैक्षणिक, वैद्यकीय, प्रवास खर्च मी वेगळा देतो”.

“मुलांसाठी मी तिला आलिशान कारही दिली होती. पण ती कार आलियाने विकली आणि ते पैसे स्वतःवरच खर्च केले. मी माझ्या मुलांसाठी वर्सोवा समुद्रकिनारी एक मोठं घरही खरेदी केलं आहे. आलियाचाही या घरावर हक्क आहे. शिवाय दुबईमध्येही मुलांसाठी मी घर घेतलं आहे. जेणेकरुन त्या देशामध्येही ते सुरक्षित राहतील. तिला अजून पैसे हवे आहेत म्हणून माझ्यासह माझ्या आईवरही तिने केस केली. तिने याआधीही असंच केलं आहे. पण तिच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आलिया केस मागे घेते”.

आणखी वाचा – एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…

पुढे तो म्हणाला, “या संपूर्ण प्रकरणामध्ये तिने मुलांनाही ओढलं आहे. फक्त माझ्यावर दबाव आणण्यासाठी, माझी प्रतिमा, करिअर खराब करण्यासाठी तसेच स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ती हे सगळं करत आहे”. नवाजुद्दीने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत असताना “मी ओराप नव्हे तर भावना व्यक्त करत आहे”. असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui allegations on wife aaliya siddiqui says she is been paid approx 10 lakh per month see details kmd