नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री नेहा शर्मा यांच्या ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटासाठी चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट आज (२६ मे) रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीजच्या एक दिवस आधी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. दरम्यान नेहा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहा शर्मा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी त्यांच्या ‘जोगिरा सारा रा रा’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आले होते. या वेळी दोघांनी एकाच रंगाचे कपडे घातले होते. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही कलाकारांना एकाच रंगाच्या कपड्यात बघून लोक त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधत आहेत. एकाने लिहिले, ‘त्यांच्यात काही चालले आहे का?’ दुसऱ्याने लिहिले, ‘मॅचिंग-मॅचिंग… काहीतरी- समथिंग.’ आणखी एकाने ‘कपल लग्नाच्या तयारीत आहे,’ अशी कमेंट केली आहे. तर काही यूजर्स या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

नेहा शर्मासोबतच्या लिंकअपच्या प्रतिक्रियांवर नवाजुद्दीन सिद्दीकीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नवाज आणि त्याची पत्नी आलियामध्ये वाद सुरू आहेत. हे वाद आता न्यायालयापर्यंत गेले आहेत. काही दिवसांपूर्वी आलियाने सोशल मीडियावर नवाजुद्दीनसाठी एक पत्र लिहिले होते. या पत्रात नवाजवरील सर्व खटले मागे घेण्याचा आणि आपल्या मुलांना चांगले भविष्य देण्याचा उल्लेख केला होता. मात्र नंतर आलियाने ही पोस्ट डिलीट केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui and neha sharma raises relationship rumours after wearing matching dress video viral dpj