अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद गेल्या वर्षी खूप चर्चेत होते. दोघांनी एकमेकांवर खूप गंभीर आरोप केले होते. पतीने आपल्याला मुलांसह मध्यरात्री घरातून बाहेर काढल्याचं आलियाने एका व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. अशातच आता आलियाने केलेल्या एक पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. तिने फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात त्यांच्या लग्नाच्या १४ व्या वाढदिवसाचा उल्लेख केला आहे.
आलिया सिद्दीकीने सांगितलं की नवाजुद्दीन तिला व मुलांना भेटायला दुबईला आला होता. “माझ्या आयुष्यात अलीकडच्या काळात काही गोष्टी बदलल्या आहेत. मला वाटलं की आपण वाईट गोष्टी जगाबरोबर शेअर करतो तर चांगल्या गोष्टीही केल्या पाहिजेत. नवाज इथे होता, त्यामुळे आम्ही मुलांबरोबर लग्नाचा वाढदिवस साजरा केला. इतकंच नाही तर नवाजुद्दीन डिसेंबर २०२३ मध्ये दुबईमध्ये होता. आम्ही सर्वांनी एकत्र नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं,” असं आलियाने म्हटलंय. तिने फॅमिली फोटो शेअर करून लग्नाचा १४ वा वाढदिवस आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करत असल्याचं लिहिलं आहे.
घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”
आलिया पुढे म्हणाली, “आमच्या नात्यात आम्हाला ज्या समस्यांना सामोरं जावं लागलं त्या नेहमीच तिसऱ्या व्यक्तीमुळे होत्या असं मला वाटतं. पण आता सगळे गैरसमज दूर झाले आहेत. आमच्या मुलांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आता आयुष्यात वेगळे राहण्याचा पर्याय नाही, कारण मुलंही मोठी होत आहेत. तसेच आमची मुलगी शोरा तिच्या बाबांच्या खूप जवळ आहे, त्यामुळे जे घडलं त्यावर ती नाराज होती. या गोष्टींचा तिला त्रास होत होता, म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही न भांडता एकत्र राहू.”
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
पत्नी व मुलांबरोबर वेळ घालवून नवाजुद्दीन मुंबईला परतला आहे. तर मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने आपणही लवकरच भारतात येणार असल्याचं आलियाने सांगितलं. वर्षभरापूर्वी एकमेकांवर गंभीर आरोप करणारे नवाजुद्दीन व आलिया यांच्यातील सर्व गैरसमज दूर झाले असून आता ते आनंदाने एकत्र राहत आहेत.