गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीचं वैवाहिक आयुष्य चर्चेचा विषय ठरत आहे. नवाजुद्दीनची पूर्वाश्रमीची पत्नी आलिया सिद्दीकी सातत्याने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. नवाजुद्दीनसह त्याच्या कुटुंबियांवरही आलियाने छळ केल्याचा आरोप केला. या सगळ्या प्रकरणामध्ये नवाजुद्दीनच्या मुलांनाही तिने सहभागी करुन घेतलं. पण आलिया करत असलेले सगळे आरोप खोटे असल्याचं नवाजुद्दीने सोशल मीडियाद्वारे सांगितलं.

आणखी वाचा – शहरातला फ्लॅट सोडून महाबळेश्वरमध्ये घर बांधत तिथेच स्थायिक झाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; आता नवऱ्यासह करतेय शेती, म्हणाली…

Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…
Jitendra Awhad, Mumbra Marathi case, Mumbra ,
मुंब्रा मराठी प्रकरणावर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लहान मुलांच्या वादाला…”
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

आता नवाजुद्दीन व आलियामधील वाद आणखीनच वाढला आहे. नवाजुद्दीनचा सख्खा भाऊ शम्सुद्दीन सिद्दीकीने (Shamas Nawab Siddiqui) अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीनच्या भावाने ट्वीटद्वारे एक पत्रक शेअर केलं आहे. यामध्ये त्याने नवाजुद्दीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

नवाजुद्दीने १००० कोटी रुपयांच्या नुकसानाची मागणी करत भाऊ व पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नवाजुद्दीनच्या भावाने धक्कादायक खुलासे केले आहेत. “नवाजुद्दीनने तीन लग्न केले आहेत. एक लग्न त्याने लॉकडाऊन असताना इशाबरोबर केलं. हल्दवानी (उत्तराखंड) येथे राहणारी फिरोजा ही त्याची पहिली पत्नी आहे. नवाजुद्दीने त्याची वहिनी गरोदर असताना तिला लाथ मारली”. असे आरोप नवाजुद्दीनच्या भावाने केले आहेत.

आणखी वाचा – मोठा अपघात, केईएम रुग्णालयामध्ये तीन महिने उपचार अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

पुढे नवाजुद्दीनचा भाऊ म्हणाला, “मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे असं नवाजुद्दीन सगळ्यांना सांगतो. पण तो एका श्रीमंत कुटुंबामधील व्यक्ती आहे. त्याने दोन आठवड्यांपूर्वी कोट्यवधी रुपयांची जमीन नवाजुद्दीने त्याच्या दुसऱ्या भावंडांना दिली. तुझ्या निर्मात्यांचं तू १५० कोटी रुपयांचं नुकसान केलं आहेस त्याकडे लक्ष दे. नऊ चित्रपट तुझ्या वागणूकीमुळे रखडले आहेत. अभिनेता म्हणूनही तुझी किंमत शून्य आहे”. नवाजुद्दीनच्या भावाने अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता या आरोपांवर नवाजुद्दीन काही उत्तर देणार का? हे पाहावं लागेल.

Story img Loader