नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. पत्नी व भावाबरोबरचं त्याचं भांडण अद्याप संपलं नाही. गेल्या काही दिवसांपासून आलिया सिद्दीकी व शमास सिद्दीकी सातत्याने त्याच्यावर आरोप करत आहेत. आता शमासने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्याची पत्नी शीबा शमास सिद्दिकीने देखील नवाजवर अनेक आरोपांसह काही धक्कादायक गोष्टींचा ट्विटरवर खुलासा केला आहे.
शमास सिद्दीकी यांनी स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नवाजने केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाबद्दल बोलत आहे. शमासने स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या नाकातून खूप रक्त पडत आहे. हा व्हिडीओ शेअर करत शमासने लिहिले आहे की, “जर मी नवाजुद्दीनच्या विरोधात आवाज उठवला असता तर माझी ११ वर्षे वाचली असती आणि मला शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागला नसता. तो कर्मचार्यांना मारहाण करायचा आणि मला मारहाण करायचा, तर माझ्या शूटवर सुपरवायझिंग प्रोड्युसरलाही ३-४ हजार लोकांसमोर मारायचा. लवकरच हा व्हिडीओ सर्वांसमोर येणार आहे.”
प्रियांका चोप्राने ३०व्या वर्षी केलेले Eggs Freeze; आता खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईने…”
याशिवाय शमासने एक ऑडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये नवाज म्हणतोय ‘तू जिथे उभा आहेस, तिथे उभं राहण्याची तुझी लायकी नव्हती’ त्यावर त्यावर शमास म्हणतो, ‘तुझ्यापेक्षा जास्त आयकर फाइल्स होत्या’. यात तो अधिकृत आकडेवारीचाही संदर्भ देताना ऐकू येतो, तर नवाज मधेच शिवीगाळही करत आहे. नवाज म्हणतो ‘मी तुझ्यावर गेल्या आठ वर्षांत केलेल्या फसवणुकीबद्दल खटले दाखल करणार आहे.’ मात्र, हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर शमासने कॅप्शनमध्ये असंही म्हटलं आहे की, ही ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप जुन्या आहेत.
या व्हिडीओनंतर शीबा शमास सिद्दीकीनेही ट्वीट केले आहे आणि लिहिले आहे की, “तो ११ वर्षांपासून माझ्या पतीचा छळ करत आहे आणि आता त्याचे करिअर संपवण्याचा आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. माझा नवरा आता एकटा नाही की तू वर्षानुवर्षे त्याला मारहाण, छळ करत राहशील.” या ट्वीटमध्ये शीबाने मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केले आहे.
मुंबई पोलिसांनीही शीबाच्या ट्विटला उत्तर दिले असून या प्रकरणाविरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.