बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजु्द्दीन व त्याच्या कुटुंबियांवर पत्नी आलियाने छळ केल्याचा आरोप केला आहे. नवाजुद्दीनने बलात्कार केल्याचा आरोपही आलियाने केला होता. आता पुन्हा आलियाने व्हिडीओ शेअर करत मुलांना व तिला घराबाहेर काढलं असल्याचं म्हटलं आहे.

आलिया सिद्दीकीने इन्स्टाग्रामवरुन दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. रात्री मुलांसह घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप आलियाने या व्हिडीओत केला आहे. आलियाचा हा व्हिडीओ नवाजुद्दीनचा भाऊ शमासने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची पत्नी आलिया मुलांसह बंगल्याच्या गेटबाहेर उभी असल्याचं दिसत आहे. नवाजची मुलगी व्हिडीओत रडताना दिसत आहे.

dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Bride's Father Calls Off Wedding After Groom Dances
Viral News : नवरदेवाचे स्वत:च्याच लग्नात ‘चोली के पिछे क्या है’ गाण्यावर ठुमके; मुलीच्या वडिलांनी मोडलं लग्न
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”

हेही वाचा>> आजारी आईला भेटायला गेलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, सख्ख्या भावाने बाहेरचा रस्ता दाखवला अन्…; व्हिडीओ व्हायरल

आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलं, “हे आहे नवाजुद्दीन सिद्दीकीचे सत्य, त्याने स्वतःच्या निष्पाप मुलांनाही सोडलं नाही. ४० दिवस घरात राहिल्यानंतर मी बाहेर पडले होते, कारण वर्सोवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला तातडीने बोलावलं होतं, पण जेव्हा मी घरी परतले तेव्हा मला माझ्या मुलांसह आत येऊ देऊ नये म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीने गार्ड्स नेमले होते. मला आणि माझ्या मुलांना या माणसाने क्रूरपणे रस्त्यावर सोडून दिलं,” असा आरोप तिने केला आहे.

हेही वाचा>> Video: “त्याने मला मुलांसह मध्यरात्री घराबाहेर काढलं”; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा आरोप, मुलीची रडून रडून झालीय अशी अवस्था

हेही वाचा>> शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर SEBI ने बंदी घातल्यानंतर अर्शद वारसीचं ट्वीट, अभिनेता म्हणाला “कष्टाने कमावलेला पैसा…”

शमासने आलिया व मुलांचा व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीनच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. “मुलांना तरी सोडून दे. नवाजुद्दीन सिद्दीकी तू आठवडाभर महान बनण्याचा ड्रामा केलास आणि लोकांना बदनाम केलंस. त्यांनतर आजारी आईला बघायला येण्याचा ड्रामा केलास. किती वाईट आहे हे”, असं शमासने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. नवाजुद्दीनचा भाऊ शमासचं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान, नवाजु्द्दीन आजारी आईची भेट घेण्यासाठी गेला असता त्याला सख्ख्या भावाकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.फैजुद्दीनने नवाजला त्याच्या बंगल्यात पाऊलही ठेवून दिलं नाही. गेटवरुनच नवाजची हकालपट्टी त्याच्या भावाने केली.

Story img Loader