नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकवर पत्नीने त्याचे अफेअर असल्याचे आरोप केले आहेत. त्याशिवाय मुलीसंदर्भातही अनेक गंभीर आरोप तिने पतीवर केले. त्यानंतर शुक्रवारी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने दोन व्हिडीओ शेअर करत पतीने आपल्याला रात्री मुलांसह घराबाहेर काढल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर नवाजुद्दीन सिद्दीकीने उत्तर दिलं आहे.

Video: “त्याने मला मुलांसह मध्यरात्री घराबाहेर काढलं”; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा आरोप, मुलीची रडून रडून झालीय अशी अवस्था

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या प्रवक्त्याने आलियाने लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आलियाने जे काही बोलली ते खोटं असल्याचा दावा प्रवक्तत्याने केला आहे. नवाजुद्दीनने संपत्ती आधीच त्याची आई, मेहरुनिसा सिद्दीकी यांच्या नावावर केली आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती नाही. त्याच्या आईच्या केअरटेकरने मुलांना घरात येण्याची परवानगी दिली आहे आणि फक्त आलियाला घराच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई आहे. नवाजुद्दीनने आधीच आलियासाठी मुंबईत एक फ्लॅट घेतला होता, जो तिने सध्या भाड्याने दिला आहे, असंही प्रवक्त्याने सांगितलं.

दरम्यान, आजारी आईला भेटायला गेलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीला भावाने गेटवर अडवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आलिया सिद्दीकीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. त्यात पतीने मुलांबरोबर रात्री बाहेर काढल्याचा दावा तिने केला होता. त्या व्हिडीओत त्यांची मुलगी शोरा हमसून हमसून रडताना दिसत होती.

Story img Loader