अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन व त्याची पत्नी आलियामधील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीनवर त्याच्या पत्नीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत मुलांसह मध्यरात्री घराबाहेर काढल्याचा आरोप आलियाने केला होता.

आलिया व तिच्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आलिया मुलांसह नवाजुद्दीनच्या बंगल्याच्या गेटवर उभी असल्याचं दिसत होतं. घराबाहेर काढल्यानंतर रडून रडून नवाजुद्दीनच्या मुलीची वाईट अवस्था झाल्याचंही व्हिडीओत दिसत होतं. याप्रकरणावर आता नवाजुद्दीनचा भाऊ शमासने प्रतिक्रिया दिली आहे. शमासने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने या प्रकरणावर भाष्य केलं. नवाजने मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर मुलीने त्याला फोन केल्याचा खुलासा शमासने केला आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

हेही वाचा>>“मुलांना तरी सोड” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘त्या’ कृतीमुळे भावाचा संताप, व्हिडीओ शेअर करत म्हणाला “किती वाईट…”

हेही वाचा>> “भारतात लोकशाही संकटात आहे” राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याचा संताप, ट्वीट करत म्हणाला “निर्बुद्ध माणूस…”

शमास म्हणाला, “मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर आलिया व मुलं बराच वेळ बंगल्याच्या गेटबाहेर होते. आता ते भाची शिवानीच्या घरी राहत आहेत. घराबाहेर काढल्यानंतर नवाजुद्दीनला त्याची मुलगी शोराने फोन केला होता. त्यावर बंगल्यात फक्त तू येऊ शकतेस…पण फक्त तूच…आलिया व यानी(नवादुद्दीनचा मुलगा) घरात येऊ शकत नाहीत, असं नवाजुद्दीन मुलीला म्हणाला”.

हेही वाचा>> सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच अभिनेत्रीची वहिनी चिंतेत, म्हणाली, “दीदी तुम्ही…”

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीचे कुटुंबातील व्यक्तींबरोबरही वाद असल्याचं समोर आलं आहे. आजारी असलेल्या आईला भेटायला गेलेल्या नवाजला त्याचा सख्खा भाऊ फैजुद्दीने बाहेरचा रस्ता दाखवला होता. नवाजला फैजुद्दीनने बंगल्याच्या गेटवरुनच परत पाठवलं. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. याशिवाय नवाजचे भाऊ शमासबरोबरही वाद आहेत. या प्रकरणानंतर शमासने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

Story img Loader