गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीचं वैवाहिक आयुष्य चर्चेचा विषय ठरत आहे. नवाजुद्दीनची पूर्वाश्रमीची पत्नी आलिया सिद्दीकी सातत्याने त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे. नवाजुद्दीनसह त्याच्या कुटुंबियांवरही आलियाने छळ केल्याचा आरोप केला. या सगळ्या प्रकरणामध्ये नवाजुद्दीनच्या मुलांनाही तिने सहभागी करुन घेतलं होत. एवढच नाही तर आलियाने सोशल मीडियावर काही व्हिडीओ अपलोड करत घरातील वाद सार्वजनिक केली होती. मात्र, घरातील वाद सार्वजनिक का केली याबाबत आता आलियाने स्पष्टीकरण दिले आहे. एका मुलाखतीत आलियाने याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- Video : शाहरुखचा प्रोजेक्ट दिग्दर्शित करतोय आर्यन खान; मुलाच्या इशाऱ्यावर किंग खानने केला अभिनय

आलियाने नुकतेच News18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती सध्या तिच्या मुलांसोबत दुबईत आहे. घरगुती वाद सार्वजनिक करण्याबद्दल आलियाने सांगितले की, ‘मला या गोष्टींबद्दल सार्वजनिकपणे बोलावे लागले कारण मला खूप त्रास होत होता. मी हे नाही केले तर माझी जीव गुदमरेल असे मला वाटले. मी मानसिकरीत्या कोणत्या परिस्थितीतून गेले हे फक्त मलाच माहीत आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक गोष्टींबद्दल सार्वजनिकपणे बोलल्यास त्याला किती वेदना होत असतील याची कल्पना येऊ शकते असेही आलिया म्हणाली.

हेही वाचा- “मला रणवीरपेक्षा रणबीर जास्त आवडतो, कारण…”; दोघांची तुलना करणारे रोहिणी हट्टंगडी यांचे वक्तव्य चर्चेत

आलिया पुढे म्हणाली की, जेव्हा तुम्ही जास्त अडचणीतून जात असता तेव्हा तुम्हाला सार्वजनिक मंचाचा सहारा घ्यावा लागतो. कारण त्यावेळी तुमचे ऐकणारे कोणी नसते आणि जेव्हा तुमचे कोणी ऐकत नाही तेव्हा तुम्हाला भांडावे लागते. मी अडचणीतून जात होते आणि त्याबद्दल कोणालाही सांगू शकत नव्हते. गेल्या १२ वर्षांपासून मी यातून जात आहे. याचा माझ्या करिअरवर परिणाम होत होता. मला काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यांनी मला माझ्या करिअरमध्ये पुढे जाऊ दिले नाही आणि माझ्यावर अंकुश ठेवला.

हेही वाचा- Video: मुस्लीम लूकमुळे ट्रोल करणाऱ्यांना शानचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “हिंदू असूनही…”

पत्नी आलियाने केलेल्या सर्व आरोपांवर स्टेटमेंट प्रसिद्ध करत नवाजुद्दीनने त्याची बाजी मांडली होती. आपला घटस्फोट झाला असून पैशांसाठी आलिया आपली प्रतिमाहनन करत असल्याचा दावा नवाजुद्दीनने केला होता. नवाजुद्दीनने गेल्या महिन्यात आलियाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता आणि तिच्याकडून माफी मागण्याव्यतिरिक्त १०० कोटी रुपयांची नुकसानभरपाईही मागितली होती.