नवाजुद्दीन सिद्दीकी याचे नाव बॉलिवूडमधील बहुआयामी कलाकारांच्या यादीत घेतले जाते. त्याने आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपट केले. तसंच अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. पण त्याचप्रमाणे त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशीही झाले. एखादा चित्रपट जर अपयशी झाला तर त्यासाठी अभिनेत्याला जबाबदार धरलं जातं अशी खंत त्याने नुकतीच व्यक्त केली.
नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या त्याच्या ‘हड्डी’ या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ह्या चित्रपटात तो एका तृतीयपंथीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याने मध्यंतरी या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता. तो फोटो पाहून हा नवाजुद्दीन आहे हे ओळखणं सर्वांनाच कठीण झालं होतं. सध्या तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने चित्रपटांच्या वाट्याला येणाऱ्या अपयशाबद्दल भाष्य केलं.
आणखी वाचा : कोणे एके काळी दहा बाय दहाच्या खोलीत सात जणांबरोबर राहायचे अमिताभ बच्चन; आठवणींना उजाळा देत म्हणाले…
त्याने नुकतीच ‘न्यूज 18’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “चित्रपट चालोत अथवा नाही पण नवाजुद्दीन सिद्दीकी चालणार. याचं कारण म्हणजे मी कधीही हार मानत नाही, कितीही मेहनत घ्यायला मी कचरत नाही. यासोबतच बाकी सगळ्याच गोष्टी मी माझं काम प्रामाणिकपणे करतो की नाही यावर अवलंबून असतात.”
पुढे तो म्हणाला, “चित्रपट अपयशी होण्याची अनेक कारणं असू शकतात. कदाचित चित्रपटाचे दिग्दर्शन तितकं प्रभावी नसेल. पण चित्रपट फ्लॉप झाल्यावर आपण त्याच्या दिग्दर्शकांना नाही तर त्यातील कलाकाराला दोष देतो. या अभिनेत्याचा हा चित्रपट अपयशी झाला, असंच लोक म्हणतात.”
हेही वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नाकारली होती ‘सेक्रेड गेम्स’ची ऑफर, पण…
उदाहरणं देत तो म्हणाला, “शाहरुख खानचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. जर तो एखादा चित्रपटात प्रमुख भूमिका करत असेल आणि त्याचा चित्रपट अपयशी झाला तर दोष त्याचा नाही. कारण त्याने दिग्दर्शकाला त्या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपलब्ध करून दिले असतात. पण तरीही जर तो चित्रपट अपयशी झाला तर याचा अर्थ तो दिग्दर्शकाचा नाही किंवा त्या चित्रपटाच्या कथेचा दोष आहे. पण त्यांच्याकडे कोणीही बोट दाखवत नाही.” त्याच्या या बोलण्याने सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे.