बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन व त्याची पत्नी आलियामधील वाद विकोपाला गेला आहे. पत्नी व मुलांना नवाजुद्दीनने मध्यरात्री घराबाहेर काढल्याचं समोर आलं होतं. आलियाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत खुलासा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची मुलगी शोरा रडतानाही दिसत होतं. नवाजुद्दीनने घराबाहेर काढल्यानंतर बंगल्याच्या गेटवरुनच आलियाने हा व्हिडीओ केला होता. आलिया व तिच्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. घराबाहेर काढल्यानंतर रडून रडून नवाजुद्दीनच्या मुलीची वाईट अवस्था झाल्याचंही व्हिडीओत दिसत होतं. पत्नी व मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी ट्वीटरवर ट्रेंड झाला होता. भाऊ शमासने स्क्रीनशॉट शेअर करत याबाबत एक ट्वीट केलं आहे. “पैसे न देता ट्वीटरवर ट्रेंड झाला. हा महान अॅक्टर अभिनयासाठी ट्रेंड व्हायला हवा होता. याचं सत्य सर्वांसमोर येऊन हा घरी बसणार आहे”, असं शमासने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर मुलीने त्याला फोन केलेला , पण…”, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाचा मोठा खुलासा

नवाजने मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर मुलीने त्याला फोन केल्याचा खुलासा शमासने मुलाखतीत केला आहे. शमास ईटाइम्सशी या प्रकरणावर भाष्य करताना म्हणाला, “मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर आलिया व मुलं बराच वेळ बंगल्याच्या गेटबाहेर होते. आता ते भाची शिवानीच्या घरी राहत आहेत. घराबाहेर काढल्यानंतर नवाजुद्दीनला त्याची मुलगी शोराने फोन केला होता. त्यावर बंगल्यात फक्त तू येऊ शकतेस…पण फक्त तूच…आलिया व यानी(नवादुद्दीनचा मुलगा) घरात येऊ शकत नाहीत, असं नवाजुद्दीन मुलीला म्हणाला”.

हेही वाचा>> “भारतात लोकशाही संकटात आहे” राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याचा संताप, ट्वीट करत म्हणाला “निर्बुद्ध माणूस…”

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीचे कुटुंबातील व्यक्तींबरोबरही वाद असल्याचं समोर आलं आहे. आजारी असलेल्या आईला भेटायला गेलेल्या नवाजला त्याचा सख्खा भाऊ फैजुद्दीने बाहेरचा रस्ता दाखवला होता. नवाजला फैजुद्दीनने बंगल्याच्या गेटवरुनच परत पाठवलं. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. याशिवाय नवाजचे भाऊ शमासबरोबरही वाद आहेत. या प्रकरणानंतर शमासने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui gets trend on twitter after stopping wife and childrens to entering house kak