अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरात वाद झाला आहे. अभिनेत्याच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनची पत्नी झैनब उर्फ ​​आलिया हिच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

टीव्ही ९ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया नवाजुद्दीनच्या बंगल्यात गेल्यावर तिथे तिचा नवाजुद्दीनच्या आईबरोबर वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी बोलावले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी आलियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिच्याविरुद्ध भादंवि कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”

अनुष्का शर्मा-विराट कोहलीच्या बॉडीगार्डचा पगार ऐकून व्हाल थक्क, वर्षाकाठी देतात ‘इतके’ कोटी

नवाजुद्दीन, नवाजुद्दीनची आई आणि आलिया यांच्यात अनेक वर्षांपासून संपत्तीचा वाद सुरू आहे. त्याच वादातून ही तक्रार केली गेली असू शकते असं म्हटलं जातंय. दोघींमध्ये वाद झाल्यानंतर मेहरुनिसा यांनी वर्सोवा पोलिसांत आलियाविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी बोलावलं आहे.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे लग्न २००९ मध्ये झाले होते. या दोघांना शोरा नावाची एक मुलगी असून यानी नावाचा एक मुलगा देखील आहे.

Story img Loader