सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीचा आज १९ मे रोजी ४९ वा वाढदिवस आहे. आपला आगामी चित्रपट ‘जोगिरा सा रा रा रा’ मुळे नवाज चांगलाच चर्चेत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर नवाजने बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच नवाज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नवाज आणि त्याची पत्नी आलियाचं नातं बिघडलं असून दोघंही घटस्फोट घेणार आहेत. आलियाने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लग्नाअगोदर नवाज अभिनेत्री निहारिका सिंगला डेट करत होता. मात्र, त्यांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. एका मुलाखतीत नवाजने आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “मी हात जोडून सांगतो की…”; ‘द केरला स्टोरी’बाबत सुदीप्तो सेन यांची ममता बॅनर्जींना विनंती

नवाजुद्दीन त्याच्या जुन्या मुलाखतीत आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल मोकळेपणाने बोलला होता. नवाज म्हणाला, “मी एक स्वार्थी माणूस होतो, ज्याला फक्त स्वतःची काळजी होती. निहारिका एक समजूतदार मुलगी होती. स्वतः एक अभिनेत्री असल्यामुळे तिला माझा कामासाठीचा संघर्ष माहीत होता आणि समजला होता.”

नवाज पुढे म्हणाला, “इतर प्रेमीयुगलांसारखं आमच्यातही प्रेमाच्या गोष्टी व्हाव्यात, असं निहारिकाला वाटतं होतं. पण मी एक स्वार्थी माणूस होतो. माझं एकच काम होतं, तिच्या घरी जाणं, तिच्याशी संबंध निर्माण करणं आणि निघून जाणं. मी प्रेमाबद्दल बोलू शकलो नाही. नंतर तिला वाटू लागलं की मी एक स्वार्थी माणूस आहे, ज्याला फक्त स्वतःची काळजी आहे.” सर्व मुलींची माझ्याबद्दल एकच तक्रार आहे. प्रत्येकीला असं वाटतं की मी फक्त माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे जातो. अन्यथा तो फोनही उचलत नाही.

हेही वाचा- “मी आणि अक्षय अजूनही…,” ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी रवीना टंडनचा अभिनेत्याबरोबरच्या नात्याबद्दल मोठा खुलासा

निहारिका आणि त्यांचं नातं कसं संपलं याचा खुलासा नवाजने केला आहे. एकदा तो भेटायला निहारिकाच्या घरी गेला. नवाज म्हणाला, “मी तिच्याकडे गेलो तेव्हा तिने रेशमी झगा घातला होता. मी माझा हात तिच्या कमरेभोवती घातला आणि तिला पकडलं. पण तिने मला ढकललं. ‘नाही, नवाज! मी तुला पुन्हा भेटणार नाही. जस्ट इनफ. मी विनवणी केली, मी रडलो, मी माफी मागितली. पण ती ठाम राहिली. तिने निर्धार केला होता. तेव्हाच आम्ही वेगळे झालो.” यानंतर नवाजच्या आयुष्यात सुनीता नावाची मुलगी आली. पण ते नातंही फार काळ टिकलं नाही. त्यामुळे नवाज नैराशात गेला होता.

नवाजुद्दीन सिद्दिकी नुकताच ‘अफवा’ या चित्रपटात दिसला होता. आता तो ‘जोगिरा सा रा रा रा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्याबरोबर नेहा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. संजय मिश्रा, महाक्षय चक्रवर्ती आणि झरीना वहाब हे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. हा चित्रपट २६ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui on his and actress niharika singh breakup said i was rascal in relationship dpj