बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपला आगामी चित्रपट ‘जोगिरा सा रा रा रा’मुळे चांगलाच चर्चेत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर नवाजने बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच नवाज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नुकतंच नवाजने नैराश्यावर भाष्य केलं आहे. नवाजने नैराश्यावर केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
हेही वाचा- सोनाक्षी सिन्हाही वडिलांप्रमाणे राजकारणात प्रवेश करणार? अभिनेत्री म्हणाली, “मला अभिनय क्षेत्रात…”
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत नवाज म्हणाला, ग्रामीण भागात नैराश्याचा आजार नाही. ग्रामीण भागात नैराश्य आणि मानसिक आरोग्य असं काही नसतं. अशा समस्या ही शहरी संकल्पना आहे. एवढंच नाही, तर जर गावात त्याने सांगितलं की, तो नैराश्यात आहे तर त्याला गावात मारहाण केली जाईल, असा दावाही नवाजने केला आहे. नवाज पुढे म्हणाला, “मी फक्त माझा अनुभव सांगत आहे, कदाचित मी चुकीचा असेन. पण आजही मी फक्त तीन तासांच्या अंतरावर असलेल्या माझ्या गावी गेलो आणि मला नैराश्य आहे, असं म्हटलं तर मला चपराक बसेल. ते लोक जेवण करून शेतात जाण्यास सांगतील.”
गावातील लोक मानसिक आरोग्याबाबत जागरूक नाहीत? या प्रश्नावर नवाज म्हणाला, “तिथे असं काही घडत नाही. याबद्दल कोणालाच माहिती नाही. गावात कोणाला नैराश्य येत नाही. जाऊन बघू शकता. तुम्हाला दिसेल की, लोकांना त्यांच्या छोट्याशा समस्यांचीही अतिशयोक्ती करण्याची सवय असते.” समस्या असलेले लोक त्यांचं जीवन कसं जगतात हे त्यांना का दिसत नाही, असा प्रश्नही नवाजने उपस्थित केला.
हेही वाचा- Video : सैफ अली खानचा ‘हा’ लूक पाहून नेटकऱ्यांनी केली मलायका अरोराशी तुलना; व्हिडीओ व्हायरल
नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच ‘अफवा’ या चित्रपटात दिसला होता. आता तो ‘जोगिरा सा रा रा रा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्याबरोबर नेहा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. संजय मिश्रा, महाक्षय चक्रवर्ती आणि झरीना वहाब हेदेखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. हा चित्रपट २६ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.