‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दिनचा अलीकडेच रिलीज झालेला ‘जोगिरा सारा रा रा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही, परंतु त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. आता लवकरच नवाजुद्दिनचा ‘हड्डी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : विजय वर्माबरोबर प्रेमाची कबुली दिल्यानंतर तमन्नाचा लग्नाबाबत खुलासा; म्हणाली, “जोपर्यंत मला…”

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

‘हड्डी’ चित्रपटाच्या पोस्टरवरील नवाजुद्दिनचा लुक पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले होते. पोस्टरमध्ये नवाजुद्दिन एका तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच ‘हड्डी’च्या सेटवरचा नवाजुद्दिनचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. व्हायरल फोटोमध्ये अभिनेत्याने लाल रंगाची साडी आणि दागिने परिधान केलेले दिसत आहेत. नवाजुद्दिनच्या लुकबाबत निर्माती राधिका नंदाने मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video : हनुमानाच्या प्रतिमेची पूजा केली, प्रसाद म्हणून केळी दाखवली अन्…; ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या चित्रपटगृहातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राधिकाने सांगितले की, “‘हड्डी’ चित्रपटाच्या टीमला नवाजुद्दिनच्या संपूर्ण लुकवर अभ्यास करण्यासाठी सुमारे सहा महिने लागले. पहिल्याच दिवशी त्याला साडी नेसवायला जवळपास तीस मिनिटे आणि पूर्ण लुक करायला तीन तास लागले. या वेळी नवाजुद्दिनने आयुष्यात पहिल्यांदाच साडी नेसली होती. त्याचा लुक शक्य तेवढा नॅचरल ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे प्रतिनिधित्व करणारा ‘हड्डी’ हा बॉलीवूडमधील महत्त्वपूर्ण चित्रपट ठरेल.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’मध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे शुर्पणखाची भूमिका, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का

राधिका नंदा पुढे म्हणाली, “नवाजुद्दिनने संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंगसाठी जवळपास ८० साड्या वापरल्या. त्याने स्वत:ला पहिल्यांदा जेव्हा आरशामध्ये पाहिले तेव्हा त्याला खूप आनंद झाला. त्याला याचीही जाणीव झाली की, एका महिलेला दररोज सकाळी साडी नेसून आपले काम करणे किती कठीण गोष्ट आहे.” दरम्यान, नवाजुद्दिन सिद्दिकी मुख्य भूमिका साकारत असलेला ‘हड्डी’ चित्रपट या वर्षाखेरीस रिलीज होणार आहे.

Story img Loader