‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी व अभिनेत्री अवनीत कौर यांचा किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. ४९ वर्षांच्या नवाजुद्दीनचा २१ वर्षीय अभिनेत्रीबरोबरचा लिपलॉक सीन पाहून नेटकरी संतापले होते. त्यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरवरून नवाजुद्दीनवर तसेच निर्मात्या कंगना रणौतवर खूप टीका केली होती. यावर नवाजुद्दीन सिद्दिकीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

४९ वर्षीय नवाजुद्दिनचा २१ वर्षांच्या अभिनेत्रीबरोबर किसिंग सीन, संतापलेले नेटकरी निर्मात्या कंगनालाही सुनावत म्हणाले, “बापलेक…”

‘इंडिया टुडे’शी बोलताना वयाने मोठ्या अभिनेत्याने लहान अभिनेत्रीबरोबर रोमान्स करण्यात अडचण काय आहे, असा प्रश्न नवाजुद्दीन सिद्दिकीने विचारला. “रोमान्सला वयाचं बंधन नसतं. तरुणांमध्ये रोमान्स शिल्लक राहिलेला नाही, ही समस्या आहे. आम्ही त्या पिढीचे आहोत, जिथे आम्ही वर्षानुवर्षे प्रेमात असायचो. आजही शाहरुख खान रोमँटिक भूमिका करत आहे, कारण तरुण पिढी कोणत्याच कामाची नाही. त्यांना रोमान्स माहीत नाही,” असं नवाजुद्दीन म्हणाला.

Photos: “इसके पेट पे बाण मारिए प्रभू”, ‘आदिपुरुष’ पाहिल्यानंतर इंटरनेटवर मीम्सचा पाऊस; तुम्हीही पोट धरून हसाल

नवाजुद्दीन सिद्दिकीने आताच्या पिढीचं प्रेम फक्त सोशल मीडियावर असल्याचं म्हटलंय. “आता सर्व काही व्हॉट्सअॅपवर घडतं, मग ते प्रेम असो वा ब्रेकअप असो. खरं तर ज्या लोकांनी रोमान्स केला आहे, जे रोमान्स जगले आहेत, तेच रोमान्स करू शकतात. दुसरं कोण करेल?” असं मत अभिनेत्याने मांडलं.

‘टिकू वेड्स शेरू हा चित्रपट २३ जूनला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार होता, पण निर्मात्यांनी निर्णय बदलत तो ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे.

Story img Loader