अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा तो साकारत असलेल्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे चर्चेत असतो. हटके व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘सेक्रेड गेम्स’, ‘अफवाह’, ‘हड्डी’ या चित्रपटांसाठी विशेष कौतुक केलं जातं. अभिनयाव्यतिरिक्त तो इतर कलाकार व बॉलीवूडबद्दल त्याची मतंही मांडत असतो. आता त्याने चित्रपटांसाठी मिळणाऱ्या मानधनाबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीने कलाकारांचं मानधन किती असतं? त्यांना मानधनासाठी वाटाघाटी कराव्या लागतात का? या गोष्टींबाबत खुलासा केला. ‘अनफिल्टर्ड बाय समदिश’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, इंडस्ट्रीमधले कलाकार किती कमावतात याचा अंदाज विचारला असता नवाजुद्दीन म्हणाला, “चित्रपटातील कलाकारांचं मानधन खूप असतं. कधी ते १० कोटींच्या आसपास असतं, तर कधी त्यापेक्षाही कमी किंवा जास्त असतं.”

हेही वाचा…आवडती अभिनेत्री कोण? विचारल्यावर अशोक सराफांनी घेतलेलं ‘या’ अभिनेत्याचं नाव, वाचा किस्सा

तुम्ही कधी मानधनासाठी वाटाघाटी करता का? असा प्रश्न विचारल्यावर नवाजुद्दीनने सांगितलं की, “नाही, मी वाटाघाटी नाही करत. फिल्म इंडस्ट्री तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला मानधन देते. जर तुम्ही वाटाघाटी करण्याबाबत चर्चा केली, तर ते विचारतात की, तुम्ही एवढ्या मानधनासाठी खरंच पात्र आहात का? तुमची पात्रता तुमच्या अभिनयामुळे, कलेमुळे ठरते,” असंही नवाजुद्दीनने नमूद केलं.

काही चित्रपट फक्त पैसे कमावण्यासाठीच करतो

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “खरंतर काही चित्रपट मी फक्त पैसे कमावण्यासाठी करतो आणि त्या पैशांचा वापर मी ‘मंटो’ सारख्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी करतो.”

हेही वाचा… Bigg boss 17 मधील ‘या’ स्पर्धकावर रोहित शेट्टी झाला खूश; ‘खतरों के खिलाडी’ शोची दिली ऑफर

‘बॉम्बे टाईम्स’च्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने खुलासा केला होता की लहान भूमिका असलेले चित्रपट स्वीकारणं त्याने बंद केलं आहे. २५ कोटींची ऑफर आली पण ती भूमिका लहान असेल तर स्वीकारणार नाही असं तो म्हणाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui revealed the earnings of bollywood actors in an interview with unfiltered by samdish dvr