अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या ‘हड्डी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. त्याच्या या लूकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतंच नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याची ही भूमिका त्याने कशी साकारली? याबद्दल सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘हड्डी’ हा नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. यात तो स्त्री पात्र आणि तृतीयपंथी अशा दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा आणखी एक लूक नुकताच समोर आला. त्यात त्याने हिरव्या साडी नेसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबर कपाळावर लाल टिकली, भडक रंगाची लिपस्टिक, गळ्यात मोत्यांची लांब माळ, नाकात नथ घातली आहे. त्याच्या या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. नुकतंच एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने तृतीयपंथीयाच्या भूमिकेसाठी कशी तयारी केली? याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

‘न्यूज १८ डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “मी ‘हड्डी’ चित्रपटात अनेक तृतीयपंथीयांबरोबर काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी मी जवळपास २० ते २५ तृतीयपंथीयांबरोबर राहिलो. मी त्यांना समजून घेतले.”

“तृतीयपंथीय व्यक्ती जगाकडे कोणत्या नजरेने पाहतात, याचे निरीक्षणही केले. ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मला त्यांच्या या प्रवासातून खूप काही शिकायला मिळाले. मी यातून खूप गोष्टी शिकलो. मला या चित्रपटातील भूमिका एखाद्या व्यंगचित्राप्रमाणे साकारायची नव्हती. मला ते पात्र खऱ्या आयुष्याप्रमाणे जगायचे होते. मला पडद्यावर खरा आहे, हे दाखवायचे होते. त्यामुळेच मी त्यांच्याबरोबर राहिलो. आता ती भूमिका प्रेक्षकांना आवडते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे”, असेही त्याने सांगितले.

आणखी वाचा : “न्यासा दर आठवड्याला…” लेकीने चेहऱ्याची सर्जरी केल्याच्या चर्चांवर काजोलने सोडले मौन

दरम्यान ‘हड्डी’ या चित्रपटात नवाजुद्दीन स्त्री आणि तृतीयपंथी अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका आहे. जवळपास ४ वर्षांपासून नवाजुद्दीन या चित्रपटावर काम करत होता. हा चित्रपट येत्या २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.