नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या अभिनयाइतकाच स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे. तो चित्रपटसृष्टीतील रंगभेद आणि पारंपारिक भूमिकांबद्दल भाष्य करतो. त्याला त्याच्या रंगावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर नवाजुद्दीन अनेकदा उत्तर देतो. तसेच आपल्या सावळ्या रंगामुळे चित्रपटांमध्ये मागणी असल्याचंही तो म्हणाला. यावेळी नवाजने रिंकू राजगुरू आणि स्मिता पाटील या अभिनेत्रींचे ऑन-स्क्रीन सौंदर्याबद्दल कौतुकही केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आधी इस्लामसाठी सोडली मनोरंजनसृष्टी, आता हिजाब परिधान करून केलं लग्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

२०१७ मध्ये, नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, इंडस्ट्रीतील वर्णद्वेषी लोकांमुळे त्याला बऱ्याच वेळा नकारांचा सामना करावा लागला आहे. इतर बॉलिवूडच्या टिपिकल देखण्या नायकांप्रमाणे न दिसण्याच्या समस्यांवर मात करण्याबाबत नवाजने म्हणाला, “जर त्यांना गोऱ्या लोकांची गरज असेल तर त्यांना माझीही गरज आहे. मला मागणी आहे. काळ्या त्वचेच्या लोकांना मागणी आहे. कॅमेरा जे सौंदर्य टिपू शकतो ते खूप वेगळे आहे. हे एक प्रामाणिक प्रकारचे सौंदर्य आहे. जर मी कॅमेऱ्यासमोर प्रामाणिक राहिलो तर प्रेक्षकांना कळणार नाही, पण मी सुंदर दिसू लागेन,” असं नवाज म्हणाला.

बाप-लेकीचं अनोखं ट्युनिंग! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीला पाहिलंत का? पहिल्यांदाच दिसली कॅमेऱ्यासमोर

“सैराटमध्ये रिंकू राजगुरू पाहा. चित्रपटांमध्ये रुढीबद्ध असलेलं रूप असूनही चित्रपटातील तिची उपस्थिती काही मिनिटांनंतर तुम्हाला मंत्रमुग्ध करू लागते. चित्रपट पाहताना एका क्षणी मी खरंच ‘ही मुलगी किती सुंदर आहे,’ असं म्हटलं होतं. मला विश्वास आहे की कॅमेऱ्याने स्मिता पाटील यांचे सौंदर्य इतर कोणत्याही भारतीय अभिनेत्रीसारखेच टिपले आहे. माझ्या मते ती कॅमेऱ्यातील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. मला वाटते की ऑन-स्क्रीन सौंदर्य वास्तविक जगातील सौंदर्यापेक्षा खूप वेगळं आहे,” असं नवाजुद्दीन पुढे म्हणाला.