भारतीय मनोरंजन विश्वात बरेच वेगवेगळे प्रयोग झाले. त्यापैकी एक प्रयोग म्हणजे अभिनेत्यांनी स्त्रीपात्र साकारणे. प्रत्येक कलाकार हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत असतो. पण आतापर्यंत हिंदी आणि मराठीसृष्टीत अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी उत्तमरित्या स्त्री पात्र साकारलं आहे. आता पुन्हा एक लोकप्रिय अभिनेता त्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी.

केले काही महिने तो त्याच्या आगामी ‘हड्डी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील त्याचा पहिला लोक आउट झाला होता. तेव्हा तो नवाजुद्दीन आहे असा विश्वास कोणालाही बसला नाही. त्या पाठोपाठ नवाजुद्दीने त्याचा एक नवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

आणखी वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव

या फोटोमध्ये नवाजुद्दीन स्त्री पात्राच्या वेशात दिसत आहे. या फोटोत नवाझुद्दीनने हिरव्या साडी नेसलेली असून कपाळावर लाल टिकली, भडक रंगाची लिपस्टिक, गळ्यात मोत्यांची लांब माळ, नाकात चमकी घातली आहे. हा फोटो पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.

या फोटोत नवाजुद्दीन बरोबर अनेक ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत. याचं कारण म्हणजे या चित्रपटात तो अनेक ट्रान्सजेंडर व्यक्तींसोबत काम करताना दिसणार आहे. हा फोटो शेअर करताना या सगळ्यांबरोबर काम करण्याचा त्याचा अनुभव कसा होता हे त्याने कॅप्शनमधून सांगितलं.

हेही वाचा : ओटीटीच्या नव्या नियमांचा नवाजुद्दीन सिद्दिकीला फटका; तब्बल ७ चित्रपटांच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह

फोटो शेअर करत त्याने लिहिलं,”‘हड्डी’ चित्रपटात ट्रान्सजेंडर्ससोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच छान होता. त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी सम्मानाची गोष्ट होती. या चित्रपटाच्या माध्यमातून मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचे आणि बऱ्याच गोष्टी शिकण्याचे भाग्य लाभले. या चित्रपटाचा शूटिंग हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता.”

या चित्रपटात नवाजुद्दीन स्त्री आणि ट्रान्सजेंडर अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका आहे. जवळपास ४ वर्षांपासून नवाजुद्दीन या चित्रपटावर काम करत होता. हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader