सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने २०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळूनही हा चित्रपट अजूनही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर आता अनेक कलाकार आपली प्रतिक्रिया देत आहे. बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीनेही या चित्रपटावरून सुरू असलेला वाद आणि या चित्रपटाला घालण्यात आलेल्या बंदीबाबत वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- शाहिद कपूरबाबत प्रसिद्ध अभिनेत्याची भविष्यवाणी; म्हणाला, ‘आता याचं करिअर ..’

नवाजुद्दिन सिद्दिकी सध्या त्याच्या ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तो अभिनेत्री नेहा शर्मासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नवाजचा हा चित्रपट २६ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आता नवाजने न्यूज१८ ला दिलेल्या मुलाखतीत ‘द केरला स्टोरी’वरून सुरू असलेला वाद आणि चित्रपटावर घालण्यात आलेल्या बंदीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाचे नाव न घेता नवाज म्हणाला की, “जर एखादा चित्रपट किंवा कादंबरी एखाद्याचे मन दुखावत असेल तर ते चुकीचे आहे.”

नवाजुद्दिन सिद्दिकीने आवाहन केले की, “प्रेक्षक किंवा त्यांच्या भावना दुखावणारे चित्रपट बनवू नका. ‘चित्रपट लोकांना एकत्र आणण्यास सक्षम असावा. त्यांच्यात फूट पाडू नये.’ एखाद्या चित्रपटात माणसांना एकमेकांपासून तोडण्याची ताकद असेल, तर ते चुकीचे आहे.’

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन एवढा वाद का?

अदा शर्मा स्टारर चित्रपट ‘द केरला स्टोरी’ ही तीन महिलांची कथा आहे, ज्यामध्ये त्यांना धर्माच्या माध्यमातून ISIS मध्ये कसे भरती केले जाते, हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले आहे. या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाईही केली आहे.

हेही वाचा- सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम करायचा करण जोहर, दोघांनीही एकाच शाळेमध्ये शिक्षण घेतलं पण…

नवाजुद्दिन सिद्दिकीच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर तो नुकताच ‘अफवा’ या चित्रपटात दिसला होता. आता तो ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्याबरोबर नेहा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. संजय मिश्रा, महाक्षय चक्रवर्ती आणि झरीना वहाब हेदेखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. हा चित्रपट २६ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui speaks on the kerala story ban and controversy dpj