बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने खुलासा केला आहे की तो नियमित मद्यपान करत नाही. तो दारू पितो, पण क्वचितच पितो आणि खूप कमी पितो. त्याने एक जुनी आठवण सांगितली. होळीच्या वेळी स्वानंद किरकिरेंनी त्याला थंडाई प्यायला लावली होती, ज्याचा त्याच्यावर दोन दिवस परिणाम झाला होता.
एका मुलाखतीत नवाजुद्दीनला त्याच्या आवडत्या दारूबद्दल विचारण्यात आलं. उत्तर देत अभिनेता म्हणाला, “मी क्वचितच दारू पितो पण मी खूप कमी पितो, थोडी प्यायलावरही मला झेपत नाही.” मग त्याला विचारण्यात आलं की पहिल्यांदा तू कधी दारू प्यायला होता. त्यावर तो म्हणाला, “मी पहिल्यांदा एनएसडीमध्ये होतो तेव्हा दारू प्यायलो होतो. एका नाटकानंतर आम्ही आनंद साजरा करत होतो, तेव्हा सर्वांनी बिअर आणली. त्याआधी मी कधीही प्यायलो नाही. मी खूप साधा होतो. मी नाटकात पहिल्यांदा धूम्रपान केलं होतं.”
नवाजुद्दीन म्हणाला की त्याला मद्यपान करायला फारसं आवडत नाही. पण तो होळीच्या वेळी पितो. “माझा आवडता सण होळी आहे. कारण त्या उत्सवात तुम्हाला मद्यपान करायला मिळतं,” असं तो म्हणाला. नवाजुद्दीनने एक किस्सा सांगितला. एकदा स्वानंद किरकिरेंनी त्याला थंडाई प्यायला लावली होती, त्यानंतर थंडाईची नशा चढली आणि दोन दिवस तो त्या नशेत होता.
ज्या ठिकाणी गांजाला कायदेशीर मान्यता आहे अशा ठिकाणी त्याने गांजा ओढला आहे का? असं विचारल्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “मला गांजा ओढणं खूप आवडतं. मला खूप चांगलं वाटतं. गांजा ओढताना गाणी लावल्यानंतर मी वेगळ्याच धुंदीत असतो.