नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यात वाद सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही सातत्याने एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच आजारी आईला भेटायला गेलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याच्या भावाने बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात पतीने आपल्याला रात्री मुलांसह घराबाहेर काढल्याचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजारी आईला भेटायला गेलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, सख्ख्या भावाने बाहेरचा रस्ता दाखवला अन्…; व्हिडीओ व्हायरल

आलिया सिद्दीकीने इन्स्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केले आहेत. त्या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर तिची मुलंही दिसत आहे. गेटकडे पाहून मुलगी रडतानाही या व्हिडीओत दिसत आहे. आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलं, “हे आहे नवाजुद्दीन सिद्दीकीचे सत्य, त्याने स्वतःच्या निष्पाप मुलांनाही सोडलं नाही. ४० दिवस घरात राहिल्यानंतर मी बाहेर पडले होते, कारण वर्सोवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला तातडीने बोलावलं होतं, पण जेव्हा मी घरी परतले तेव्हा मला माझ्या मुलांसह आत येऊ देऊ नये म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीने गार्ड्स नेमले होते. मला आणि माझ्या मुलांना या माणसाने क्रूरपणे रस्त्यावर सोडून दिलं,” असा आरोप तिने केला आहे.

थिएटरमध्ये सीटखाली सापडलेली चिमुरडी; उंदरांनी कुरतडलेलं शरीर, प्रकाश झा यांनी दत्तक घेतली होती लेक दिशा

पुढे ती म्हणाली, “माझ्या मुलीला विश्वास बसत नव्हता की तिचे स्वतःचे वडील तिच्याशी असं कसं वागू शकतात आणि ती रस्त्यावर रडत होती. सुदैवाने माझ्या एका नातेवाईकाने आम्हाला तिच्या एका खोलीच्या घरात नेलं. त्याची ही मानसिकता आणि मला मुलांसह घराबाहेर फेकून देण्याची ही क्रूर योजना होती. यावरून नवाजुद्दीन सिद्दीकी हा माणूस किती खालच्या स्तराचा आहे, हे दिसून येतं. मी व्हिडीओ शेअर करत आहे, ज्यात तुम्हाला या माणसाचं सत्य दिसेल.”

आलियाने नवाजुद्दीनवर खोटी माहिती पसरवल्याचा आरोपही केला. “तुझी पीआर एजन्सी खोटी माहिती पसरवत आहे. तुच नेमलेले लोक, तुझ्याकडून पगार घेणारे लोक तुला तुझ्याच घरात जाऊ देत नाही, काय गंमत आहे ना. खरं तर तुला एका चांगल्या पीआर एजन्सीची गरज आहे, जे तुझ्यासाठी चांगले प्लॅन्स करतील. काळजी करू नको नवाजुद्दीन सिद्दीकी, तुम्ही मला आणि माझ्या मुलांची हिंमत तोडू शकत नाही. आम्ही अशा देशाचे नागरिक आहोत, जिथे न्याय मिळतो आणि आम्हालाही लवकरच न्याय मिळेल,” असं आलिया सिद्दीकी या व्हिडीओत म्हणाली.

आलियाने यावेळी नवाजुद्दीनला भावाने घरात जाऊ न दिल्याच्या दाव्यावरूनही टीका केली. त्याच्याच घरात त्याला कोण रोखू शकतं, असं ती म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui thrown us out of house claims wife aaliya daughter shora cries badly see video hrc
Show comments