अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला बराच संघर्ष करावा लागला. गेले काही महीने नवाजुद्दीनसाठी फार खास गेले नसले तरी काही दिवसांपूर्वी आलेला त्याचा ‘हड्डी’ लोकांच्या पसंतीस उतरला. यातील नवाजुद्दीनच्या कामाचीही खूप प्रशंसा झाली. आता त्याच्या आगामी चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

नवाजुद्दीन सिद्दिकीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक मध्ये खुद्द बाळसाहेबांची भूमिका निभावली होती अन् प्रेक्षकांनी ती डोक्यावरही घेतली होती. याचा दूसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दमदार बायोपीकनंतर नवाजुद्दीन सिद्दिकी हा पुन्हा एकदा अशाच एका वेगळ्या व्यक्तीच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : “सलमान खान खोटारडा…” अभिनेता चंद्रचूड सिंगची ‘ती’ कॉमेंट चर्चेत

‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार दिवंगत कस्टम ऑफिसर कोस्टा फर्नांडिस यांच्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये नवाजुद्दीन प्रमुख भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीनच्या ‘सिरियस मॅन’ची निर्माती सेजल शाह हीच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. कोस्टा फर्नांडिस यांनी ९० च्या दशकात गोव्यातील सोन्याच्या तस्करीला आळा घातला होता. त्यांच्या याच एकूण कामगिरीवर हा चित्रपट बेतलेला असण्याची शक्यता आहे.

लवकरच गोव्यामध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. कोस्टा यांचं खासगी आयुष्य आणि इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा या बायोपिकमध्ये समावेश करण्यात येणार आहे. कोस्टा यांनी अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून गोव्यातील सोने तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या. नवाजुद्दीन चाहते त्याला या आगळ्या वेगळ्या, हटके अशा भूमिकेत बघण्यासाठी फारच उत्सुक आहेत.

Story img Loader