दमदार अभिनय व विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पण सध्या नवाजुद्दीन त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनवर त्याची पत्नी आलिया व मोलकरणीनेही गंभीर आरोप केले होते. परंतु, मोलकरणीने दुसऱ्याच दिवशी अभिनेत्यावरील आरोप मागे घेतले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलियाने सुरुवातीला नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबियांवर छळ केल्याचा आरोप केला होता. रुममध्ये कोंडून ठेवून सात दिवस जेवणही न दिल्याचा गंभीर आरोप आलियाने केला होता. २४ तास तिच्यावर देखरेखीसाठी बॉडीगार्ड ठेवण्यात आला होता, असंही ती म्हणाली होती. आता आलियाने नवाजुद्दीनवर बलात्काराचे आरोप केले आहेत. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने नवाजुद्दीनवर बलात्काराचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: “मी कायमच त्याला पती मानलं, पण…” नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी कॅमेऱ्यासमोरच रडली, म्हणाली “पैशाने तू…”

हेही वाचा>> Video: “आदिल खान बायसेक्शुअल, त्याचा न्यूड व्हिडीओ…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “त्याच्या डोक्यावर केस…”

“एक महान अभिनेता जो एक महान व्यक्ती बनण्याचा दिखावा करतो. त्याची आई माझ्या मुलांना नाजायज बोलते आणि तरीही हा माणूस गप्प राहतो. वर्सोवा पोलीस स्थानकात याच्याविरोधात मी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. काहीही झालं तरी माझ्या मुलांना मी याच्याकडे सोपवणार नाही”, असं नवाजुद्दीनची पत्नी आलियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. “नवाज प्रसिद्धी व शक्तीचा गैरवापर करत आहे. पैशाने तू अजून किती जणांना विकत घेणार आहेस? पण पैशाने तू माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करू शकत नाहीस. मी तुला नेहमी माझा नवरा मानलं. पण तू कधीच मला पत्नीसारखी वागणूक दिली नाहीस. तू कधीच मला तुझी पत्नी मानलं नाहीस आणि पत्नीचा दर्जाही दिला नाहीस.तू दिलेल्या जखमा कधीच भरुन निघू शकत नाहीत”, असं आलियाने व्हिडीओत म्हटलं आहे.

हेही वाचा>> Selfiee Box Office: अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ ठरला फ्लॉप; १५० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

नवाजुद्दीन सिद्दीकी व आलियाने २००९ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना १२ वर्षाची मुलगी व सात वर्षांचा मुलगा आहे. मुलांच्या कस्टडीसाठी नवाजुद्दीनने न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत न्यायालयाने नवाजुद्दीन व त्याची पत्नी आलियाला त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या भवितव्यासाठी बोलून तोडगा काढण्याचा सल्ला शुक्रवारी(२४ फेब्रुवारी) दिला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui wife aaliya accused him filed rape complaint against bollywood actor kak