बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन व पत्नी आलियामधील वाद विकोपाला गेला आहे. आलियाने नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबियांवर छळवणुकीचा आरोप केला होता. त्याबरोबरच आलियाने नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले होते. पैसा व प्रसिद्धीचा गैरवापर करून नवाजुद्दीन मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न नवाजुद्दीन करत असल्याचं आलिया म्हणाली होती. याशिवाय नवाजुद्दीवर बलात्काराचा आरोपही तिने केला होता.

आलियाच्या आरोपांवर नवाजुद्दीनने उत्तर दिलं होतं. आलिया व मी गेले अनेक वर्षांपासून वेगळं राहत असल्याचं नवाजुद्दीन म्हणाला होता. याबरोबरच दर महिन्याला तिला १० लाख रुपये देत असल्याचंही नवाजुद्दीनने सांगितलं होतं. गप्प राहिल्यामुळे माझी प्रतिमा वाईट केली गेल्याचं नवाजुद्दीन म्हणाला होता. नवाजच्या या आरोपांवर आता आलियाने उत्तर दिलं आहे. आलियाने इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत नवाजुद्दीनच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. “तू फक्त बोलत नव्हतास, पण तू केलेल्या कृती खूप काही सांगत होत्या” असं आलियाने म्हटलं आहे. या पोस्टमधून आलियाने नवाजुद्दीनवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत.

Ashish Shelar On Saif Ali Khan Attack
Ashish Shelar : “अतिशय भितीदायक घटना, आरोपीच्या शोधासाठी…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेबाबत आशिष शेलारांची महत्वाची माहिती
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार
Haryana BJP chief Mohan Lal Badoli and Jai Bhagwan
Mohan Lal Badoli: भाजपाच्या नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडित तरुणीने सांगितली अत्याचाराची आपबिती
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…

हेही वाचा>> प्रियांका गांधींच्या PA विरोधात ‘बिग बॉस’ फेम अर्चना गौतमच्या वडिलांची पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

“नवाज तू एक बेजबाबदार वडील आहेस. माझ्या नकळत तू आपल्या अल्पवयीन मुलीला तू तुझ्या मॅनेजरबरोबर पाठवलं. माझ्या मुलगी त्या व्यक्तीबरोबर एका हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहिली. या काळात तुझ्या मॅनेजरने माझ्या मुलीला चुकिच्या पद्धतीने स्पर्श केला. ती विरोध करत असतानाही त्याने तिला मिठी मारली. तू किंवा मी आपल्या मुलीबरोबर नसताना तुझ्या मॅनेजरने केलेलं हे कृत्य तू नाकारू शकत नाहीस. तरीही तू त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतोस. या गोष्टी कळल्यानंतर एका आईने याविरोधात जाब विचारल्यानंतर तू मुलांच्या कस्टडीसाठी केस केली”, असं आलियाने म्हटलं आहे.

हेही वाचा>> हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेनची ‘अशी’ आहे अवस्था, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

पुढे तिने “तुझ्या पीआर एजन्सीकडून या गोष्टी नाकारण्याआधीच मी जानेवारी २०२३ मध्ये तुला व तुझ्या मॅनेजरला यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. पण यावर तू किंवा मॅनेजरने अजूनही उत्तर दिलेलं नाही”, असंही तिने म्हटलं आहे. आलिया व नवाजने २०१० मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना दोन मुले आहेत.

Story img Loader