बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन व त्याची पत्नी आलियामधील वाद विकोपाला गेला आहे. आलियाने नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबीयांवर छळ केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर नवाजुद्दीनने बलात्कार केल्याचा गंभीर आरोपही आलियाने केला होता. प्रसिद्धी व पैसा याचा गैरवापर करुन माझ्यापासून मुलांना दूर करण्याचा प्रयत्न नवाजुद्दीन करत आहे, असं आलिया म्हणाली होती. नवाजुद्दीनने मध्यरात्री मुलांसह घराबाहेर काढल्याचा व्हिडीओही आलियाने शेअर केला होता. आलियाने केलेल्या आरोपांवर नवाजुद्दीनने मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवाजुद्दीनने त्याच्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत पत्नी आलियाला उत्तर दिलं होतं. “आतापर्यंत शांत राहिलो म्हणून मी वाईट माणूस आहे अशी माझ्यावर टीका करण्यात आली. हा तमाशा माझ्या मुलांना कधीतरी कळणारच या कारणामुळे मी शांत होता. सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं आणि काही लोक माझ्या खराब होणाऱ्या प्रतिमेचा आनंद घेत आहेत. मी तुम्हा सगळ्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो. गेल्या काही वर्षांपासून मी व आलिया एकत्र राहत नाही. आमचा आधीच घटस्फोट झाला आहे. पण आम्ही मुलांसाठी समजुतदारीने वागलो”, असं नवाजुद्दीनने म्हटलं आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याला आलियाला १० लाख रुपये देत असल्याचंही त्याने सांगितलं. याबरोबरीच आलिया ते पैसे स्वतःसाठी खर्च करत असल्याचेही आरोप नवाजुद्दीने केले आहेत. नवाजु्द्दीनच्या आरोपांवर पत्नी आलियाने आता प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा>> घटस्फोटानंतर नवाजुद्दीन सिद्धीकीचे पूर्वाश्रमीच्या पत्नीबाबत धक्कादायक खुलासे, म्हणाला, “पैसे हवे आहेत म्हणून…”

आलियाने नवाजुद्दीनची पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे. “यामागील सत्य पुराव्यांसह मी लवकरच तुमच्या समोर आणेन. वेट अ‍ॅण्ड वॉच”, असं आलियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आलिया व नवाजुद्दीन सिद्दीकीच्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीचा संसार मोडला, घटस्फोटाबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून…”

आलिया व नवाजुद्दीनने २०१० साली लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. नवाजुद्दीनची पत्नी त्याच्या दोन्ही मुलांसह दुबईमध्ये राहते. नवाजुद्दीनवर पत्नी आलियाप्रमाणेच त्याच्या घरात काम करणाऱ्या महिलेनेही आरोप केला होता. परंतु, लगेचच घरकाम करणाऱ्या महिलेने नवाजुद्दीनवर केलेले आरोप मागे घेतले होते. नवाजुद्दीनचा भाऊ शमासनेही त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui wife aaliya on actor allegations on her kak