बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन व पत्नी आलियामधील वाद विकोपाला गेला आहे. आलियाने नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबियांवर छळवणुकीचा आरोप केला होता. त्याबरोबरच आलियाने नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले होते. पैसा व प्रसिद्धीचा गैरवापर करून नवाजुद्दीन मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न नवाजुद्दीन करत असल्याचं आलिया म्हणाली होती. याशिवाय नवाजुद्दीवर बलात्काराचा आरोपही तिने केला होता.

आलियाच्या आरोपांवर नवाजुद्दीनने उत्तर दिलं होतं. आलिया व मी गेले अनेक वर्षांपासून वेगळं राहत असल्याचं नवाजुद्दीन म्हणाला होता. गप्प राहिल्यामुळे माझी प्रतिमा वाईट केली गेल्याचं नवाजुद्दीन म्हणाला होता. याबरोबरच दर महिन्याला तिला १० लाख रुपये देत असल्याचंही नवाजुद्दीनने सांगितलं होतं. नवाजच्या या आरोपांवर आता आलियाने उत्तर दिलं आहे. आलियाने इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत नवाजुद्दीनच्या आरोपांवर भाष्य केलं आहे.

Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Dhanashree Verma break silence on Divorce Rumours
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीवर आलियाचे पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली “त्याच्या मॅनेजरने माझ्या अल्पवयीन मुलीबरोबर…”

“जर यात थोडंही तथ्य असतं तर त्याने त्याच्या बँक अकाऊंट स्टेटमेंट न्यायालयात सादर केले असते. पण त्याने असं केलं नाही. न्यायालयात त्याने स्वत: बनवलेले अस्वीकार्य पुरावे सादर केले. सादर केलेल्या पुराव्यांमधून नवाजुद्दीनने केलेले २५ टक्के आरोपही सिद्ध होत नाही आहेत”, असं तिने म्हटलं आहे. आलियाने नवाजु्द्दीनवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा>> हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेनची ‘अशी’ आहे अवस्था, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

“नवाज तू एक बेजबाबदार वडील आहेस. माझ्या नकळत तू आपल्या अल्पवयीन मुलीला तू तुझ्या मॅनेजरबरोबर पाठवलं. माझ्या मुलगी त्या व्यक्तीबरोबर एका हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहिली. या काळात तुझ्या मॅनेजरने माझ्या मुलीला चुकिच्या पद्धतीने स्पर्श केला. ती विरोध करत असतानाही त्याने तिला मिठी मारली. तू किंवा मी आपल्या मुलीबरोबर नसताना तुझ्या मॅनेजरने केलेलं हे कृत्य तू नाकारू शकत नाहीस. तरीही तू त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतोस. या गोष्टी कळल्यानंतर एका आईने याविरोधात जाब विचारल्यानंतर तू मुलांच्या कस्टडीसाठी केस केली”, असं आलियाने म्हटलं आहे.

Story img Loader